Satyajeet Tambe Happy about Closure of MahaPortal | Sarkarnama

महापोर्टल बंद होणे हा युवक कॉंग्रेसच्या वेकअप महाराष्ट्रचा विजय : सत्यजित तांबे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

महापोर्टल बंद झाले. हे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या युवकांचे यश आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे यांनी केला

नाशिक : स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यास करणारे, परिक्षा देणारे या सगळ्या युवकांमध्ये 'महापोर्टल' विषयी अतिशय मोठी नाराजी होती. त्यासाठी युवक कॉंग्रेसने 'वेकअप महाराष्ट्र' मोहिम उघडली होती. आता हे शंकास्पद महापोर्टल बंद झाले. हे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या युवकांचे यश आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे यांनी केले.

ते म्हणाले, ''विधानसभा निवडणुकीआधी युवक कॉंग्रेसने युवकांच्या प्रश्‍नांवर आंदोलन केले होते. त्यासाठी "वेकअप महाराष्ट्र' हे अभियान राबविले होते. त्यावेळी राज्यातील अनेक युवकांनी व स्प्रधा परिक्षा देणाऱ्या तरुणांनी या पोर्टल विषयी प्रश्‍न निर्माण केले होते. त्यांना या पोर्टलवर विश्‍वास नव्हता. त्यामुळे ते बंद करण्याची त्यांची मागणी होती. युवक कॉंग्रेसने देखील ही मागणी लाऊन धरली होती. राज्यात नवे सरकार आल्यावर हे पोर्टल बंद करण्यात आले आहे. त्यातून युवक. स्पर्धा परीक्षा देणारे तरुण समाधानी आहेत. हे या तरुणांचे, युवक कॉंग्रेसच्या अभियानाचे यश आहे. त्यासाठी राज्य सरकारविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.''

संबंधित लेख