संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तरुणाईशी सत्यजीत तांबे यांनी साधला संवाद - Satyajeet Tambe in Ashadhi Vari | Politics Marathi News - Sarkarnama

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तरुणाईशी सत्यजीत तांबे यांनी साधला संवाद

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 4 जुलै 2019

भागवत संप्रदायाची भगवी पताका घेऊन आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम.. चा जयघोष करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे सहभागी झाले आणि त्यांनी जेजुरी मुक्कामी असलेल्या पालखीत सहभागी झालेले शेतकरी बांधव आणि युवक-युवतींशी संवाद साधला. 

जेजुरी  : भागवत संप्रदायाची भगवी पताका घेऊन आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम.. चा जयघोष करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे सहभागी झाले आणि त्यांनी जेजुरी मुक्कामी असलेल्या पालखीत सहभागी झालेले शेतकरी बांधव आणि युवक-युवतींशी संवाद साधला. 

अंगावर पावसाच्या सरी झेलत आणि मुखी विठ्ठलनाम घेऊन हजारो शेतकरी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. या पालखी सोहळ्यात ज्याप्रमाणे देहभान विसरून शेतकरी सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे युवक - युवतीं मोठ्या संख्येने सुशिक्षीत युवक - युवतींचाही सहभाग लक्षणीय आहे. सोमवारी पालखीचा जेजुरीला मुक्काम होता. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले. यंदा पाऊस-पाणी चांगले होऊ दे आणि शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येऊ दे,  असे साकडे त्यांनी माऊलींच्या चरणी घातले. 

माऊलींच्या पालखी सोहळ्यात  दरवर्षी मोठ्या संख्येने राज्यभरातील सुशिक्षीत युवक - युवती मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदाही त्यांची  संख्या लक्षणीय आहे. तांबे यांनी मोठ्या जोशाने पंढरपुरच्या वारीत सहभागी झालेल्या तरुणाईशी दिलखुलास संवाद साधला. या वारीत सहभागी झाल्यामुळे आम्हांला सकारात्मक उर्जा मिळते, असे या तरूणांनी मला सांगितले, असेही  तांबे म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख