राज्यमंत्री सत्तार रमले मतदारसंघात; कार्यकर्त्यांसह चाय पे चर्चा

सत्तार यांच्या बंड आणि राजीनामा नाट्यानंतर मातोश्रीवरून त्यांना योग्य समज देण्यात आली होती. या घडामोडीनंतर मराठवाड्यातील आढावा बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सत्तार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्रित आले. यावेळी मात्र सत्तार यांनी झाले गेले विसरून मतदारसंघातील प्रश्न बैठकीत मांडून विकास कामांसाठी अतिरिक्त निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. दोन दिवसांच्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात राज्यमंत्री सत्तार हिरारीने सहभागी झाले.
राज्यमंत्री सत्तार रमले मतदारसंघात; कार्यकर्त्यांसह चाय पे चर्चा

औरंगाबाद : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार सध्या मतदार संघात चांगले जमले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर सत्तार आता मतदार संघातील कार्यकर्त्यांना वेळ देताना दिसत आहेत. रविवारी सिल्लोड शहरातील एका हॉटेलवर चहा घेत घेत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गेल्या महिन्याभराचा काळ सत्तार यांच्यासाठी काहीसा संघर्षाचा गेला. औरंगाबाद जिल्हा परिषदेत कॉंग्रेसाचा अध्यक्ष होऊ नये म्हणून त्यांनी केलेले बंड, त्यानंतर राज्यमंत्रिपदाचा दिलेला कथीत राजीनामा यावरून अगदी राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली होती. 

सत्तार यांच्या बंड आणि राजीनामा नाट्यानंतर मातोश्रीवरून त्यांना योग्य समज देण्यात आली होती. या घडामोडीनंतर मराठवाड्यातील आढावा बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सत्तार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्रित आले. यावेळी मात्र सत्तार यांनी झाले गेले विसरून मतदारसंघातील प्रश्न बैठकीत मांडून विकास कामांसाठी अतिरिक्त निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. दोन दिवसांच्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात राज्यमंत्री सत्तार हिरारीने सहभागी झाले. पक्षाच्या बैठकीला देखील त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यावरील राग आता शांत झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले. अब्दुल सत्तार यांनी देखील घडलेल्या घटना घटनांचा फारसा विचार न करता नव्या जोमाने कामाला सुरुवात केल्याचे दिसते. 

सत्तार यांच्याकडे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यामुळे आता लवकरच ते या जिल्ह्याचा दौरा देखील करणार आहेत. दरम्यान रविवारी सत्तार यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा केली. सामन्यांमध्ये मिळून मिसळून काम करण्याची त्यांची हातोटी असल्यामुळे सत्तार नेहमीच जनतेशी एकरूप झाल्याचे दिसून आले आहे. काल सिल्लोड मधील एका हॉटेलात पाच-पंचवीस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सत्तार यांनी चहा घेत चर्चा केली. सत्तार यांच्या साधेपणाचे कौतुक आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीची चर्चादेखील होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com