पदभार घेताच जळगावचे मनपा आयुक्त कुळकर्णीचा 'अॅक्‍शन मोड'

विधानसभेत जळगाव महापालिका आयुक्त नियुक्तीचा विषय आमदार सुरेश भोळे यांनी उपस्थित करताच शासनाने तातडीने नियुक्तीचा आदेश दिला. आज सतीश कुळकर्णी यांनी आयुक्तपदाचा पदभार स्विकारला
New Jalgaon Municipal Commissioner Satish Kulkarni Welcomed By Mayor Bharati Sonawne
New Jalgaon Municipal Commissioner Satish Kulkarni Welcomed By Mayor Bharati Sonawne

जळगाव : विधानसभेत जळगाव महापालिका आयुक्त नियुक्तीचा विषय आमदार सुरेश भोळे यांनी उपस्थित करताच शासनाने तातडीने नियुक्तीचा आदेश दिला. आज सतीश कुळकर्णी यांनी आयुक्तपदाचा पदभार स्विकारला आणि लगेच अधिकाऱ्यांना बोलावून कामाचा आढावा घेण्यास सुरवातही केली.

जळगाव महापालिकेचे आयुक्त उदय टेकाळे सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने आयुक्तपदी डॉ.माधवी खोडे-चावरे यांची नियुक्ती केली. मात्र, त्यांनी पदभार स्विकारलाच नाही. त्यामुळे हे पद रिक्तच होते, जळगाव शहरात कचरा मक्ता, अमृत योजना, भुयारी गटारी तसेच विविध प्रश्‍नावरून सत्ताधारी व विरोधकांचे जोरदार वाद सुरू झाले. त्यातच आयुक्त नियुक्त करण्याबाबत जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित केला होता. 

त्यानंतर शासनही तातडीने जागे झाले, त्यांनी सतीश कुळकर्णी यांची जळगावच्या आयुक्तपदी नियुक्ती केले. कुळकर्णी हे नगरपरिषद संचालनालयाचे उपसंचालक पदावर कार्यरत होते. त्यांना नियुक्तीचे आदेश प्राप्त होताच ते जळगाव महापालिकेच आज हजर झाले. महापौर भारती सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कुळकर्णी यांनी पदभार घेवून कामाला सुरूवातही केली. त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यानां पाचारण करून कामाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी कामाचे आदेशही दिले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com