satish chturvedi ex minister | Sarkarnama

आजचा वाढदिवस : सतीश चतुर्वेदी, कॉंग्रेस, माजी मंत्री

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

गेल्या तीन दशकांपासून नागपुरातील कॉंग्रेसच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे नाव घेतले जाते. पूर्व नागपूर मतदारसंघावर त्यांचा प्रभाव राहिला आहे. अनेक वर्षे त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपदही भूषविले. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून ते राजकारणातून काहीसे दूर फेकले तरी शहरातील कॉंग्रेसचे राजकारण त्यांच्या उल्लेखाशिवाय होऊ शकत नाही. राजकारणासोबतच त्यांचा इतिहासाचा चांगला अभ्यास असून त्यांनी गांधी चळवळीवर ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डी. लिट.ने सन्मानित केले आहे. अनेक शिक्षण संस्था उभारून नागपुरात त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख