Satish chavan runs educational institues efficiently : Vinod Tawde | Sarkarnama

सतीश चव्हाण शिक्षण संस्था चांगली चालवतात, इतरांची यादी वाचू का तांबे साहेब ? :तावडे 

सरकारनामा
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

*

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत भलामण  केली . शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे त्वरीत भर अशी मागणी सतीश चव्हाण आणि अन्य सदस्यांनी केली तेंव्हा विनोद तावडे बोलत होते . 

विनोद तावडे म्हणाले , " सतीश चव्हाण अनेक शिक्षण संथा चालवतात . चांगल्या चालवतात . दुर्गम भागातही त्यांच्या संस्था चांगल्या कार्यरत आहेत . "
त्यावेळी आमदार सुधीर तांबे मध्येच काही बोलू लागले तर त्यांना थांबवत  विनोद तावडे म्हणाले, इतरांची यादी वाचू का तांबे साहेब? तुम्हीपण त्यात आहात .. चांगल्या संस्था चालविणाऱ्या मध्ये !

त्यावर हेमंत टाकले यांनी चार वर्षे हा प्रश्न का नाही  सोडवला ? हा विषय मुख्यमंत्र्यांकडे  घ्या असे आक्रमकपणे मांडले  त्यांनाही तावडे म्हणाले , " आता मी सोडवतो ना कशाला त्यांच्यापर्यंत विषय न्यायचा ? 
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध आता उच्चाधिकार समितीत नक्की झाला आहे . आम्ही त्याची घोषणा करू . पुढच्या काळात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची  भरती करता येऊ शकते . "

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख