"पदवीधर' चे आमदार सतीश चव्हाण नॉटरिचेबल, चर्चांना उधाण

"पदवीधर' चे आमदार सतीश चव्हाण नॉटरिचेबल, चर्चांना उधाण

औरंगाबाद : राज्यात निर्माण झालेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे कोण कोण आमदार अजित पवारांसोबत आहेत ? याची चर्चा सुरू झाली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, सरकार स्थापनेच्या घडामोडीत सतीश चव्हाण यांची भूमिका फारशी महत्वाची ठरणार नसली तरी या प्रसंगी ते अजित पवारांसोबत आहेत की शरद पवारांसोबत ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान सतीश चव्हाण यांचा भ्रमणध्वनी बंद असून ते सध्या नॉटरिचेबल असल्याने विविध चर्चेला उधाण आले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण हे गेल्या दोन टर्म पासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. याशिवाय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळात देखील ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेत्या सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. पवार कुटुंबांचे विश्वासू अशी ओळख असलेले सतीश चव्हाण आज राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत कुणाच्या बाजूने उभे आहेत याची चर्चा न झाली तर नवलच. 

राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचे एकत्रित सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना काल वेग येताच आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड होऊन शपथविधी पार पडला. या राजकीय भूकंपाने सगळ्याच राजकीय पक्षांची झोप उडाली. अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांचा पाठिंबा आहे याची चर्चा सुरू झाली, तेव्हा सहाजिकच मराठवाडा आणि राज्यातील कोणते आमदार कुणासोबत आहे याच्या चर्चांनाही उधान आले . 

सतीश चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार असून ते अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात . त्यामुळे या राजकीय भूकंपामध्ये सतीश चव्हाण यांची काही भूमिका होती का? त्यांना यासंदर्भात काही माहिती होती का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात सतीश चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सकाळपासूनच त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. सतीश चव्हाण नॉटरिचेबल असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com