"समृद्धी' साठी बॅंका कर्ज देईना म्हणून सिडको - म्हाडाचा पैसा वापरला - सतीश चव्हाण

वॉटरग्रीडच्या बाबतीतही तेच घडले आहे. डीपीआरच तयार नसेल तर, योजना आणल्याचा कांगावा कसे करत होते, हा देखील प्रश्‍नच आहे. पिण्याच्या पाण्याला आमचा विरोध नव्हता. मात्र, त्यांनी आहे त्या योजना दुरुस्त करायला हव्या होत्या. नव्या सरकारला हीच विनंती राहील कि, ग्रामपंचायतींचे उत्पन्न मर्यादित असते. त्यामुळे पाण्यासाठी आणि पथदिव्यांसाठी ग्रामपंचायतींना मोफत वीज दिली पाहिजे अशी मागणी देखील सतीश चव्हाण यांनी यावेळी केली.
 "समृद्धी' साठी बॅंका कर्ज देईना म्हणून सिडको - म्हाडाचा पैसा वापरला - सतीश चव्हाण

औरंगाबाद : समृद्धी महामार्गसाठी एकही बॅंक कर्ज देत नाहीये, याचा अर्थच हा प्रकल्प अव्यवहार्य आहे. सिडको, म्हाडाचा पैसा यासाठी वापरल्याची शक्‍यता असल्याचा आरोप मराठवाडा पदवीधरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. राज्याची आर्थिक शिस्त बिघडली असून भाजप सरकारच्या काळातील समृध्दी महामार्ग आणि जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी आपण करणार असल्याचेही चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मराठवाड्यातील महावक्ता वक्तृत्व स्पर्धेची माहिती देण्यासाठी सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांना देखील हात घातला. चव्हाण म्हणाले, राज्याच्या तिजोरीत पैसा नसताना तत्कालीन युती सरकारने नवे प्रकल्प आणले. समृध्दी महामार्गासारखा सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प पण त्यासाठी एकही बॅंक कर्ज द्यायला तयार नाही. त्यामुळे सिडको, म्हाडा या संस्थांचे पैसे समृद्धीसाठी वापरले गेले असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळेच या प्रकल्पासंदर्भातील श्‍वेतपत्रिका काढून सत्य समोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. 

वॉटरग्रीडच्या बाबतीतही तेच घडले आहे. डीपीआरच तयार नसेल तर, योजना आणल्याचा कांगावा कसे करत होते, हा देखील प्रश्‍नच आहे. पिण्याच्या पाण्याला आमचा विरोध नव्हता. मात्र, त्यांनी आहे त्या योजना दुरुस्त करायला हव्या होत्या. नव्या सरकारला हीच विनंती राहील कि, ग्रामपंचायतींचे उत्पन्न मर्यादित असते. त्यामुळे पाण्यासाठी आणि पथदिव्यांसाठी ग्रामपंचायतींना मोफत वीज दिली पाहिजे अशी मागणी देखील सतीश चव्हाण यांनी यावेळी केली. 

तरुणाई शरद पवारांच्या पाठीशी 
शरद पवारांबद्दल तरुणांमध्ये प्रचंड आर्कषण आहे. अगदी (एस) कॉंग्रेसपासून तरुण शरद पवार यांच्यासोबत होते. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतरही तरुणांचा ओढा त्यांच्या मागे कायम होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तरूण पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दिसून आले आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी मंत्रीदर्जाचा किंवा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर जिल्हानिहाय जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे सतीश चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com