सतीश चतुर्वेदींचा  मुलगा करणार शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला ऊत आला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर नागपूर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. रविवारी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुष्यंत यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
सतीश चतुर्वेदींचा  मुलगा करणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई  : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला ऊत आला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर नागपूर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. रविवारी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुष्यंत यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूर विद्यापीठचे सिनेट सदस्य असून ते नागपूर येथील लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि संचालक ही आहेत. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे नागपूर आणि मुंबईत मिळून एकूण 28 शाळा महाविद्यालये असून यात 2 हजार शिक्षक कार्यरत आहेत तर 20 हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने याचा शिवसेनेला फायदा होणार आहे.

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर दोन वर्षांपूर्वीच पक्ष विरोधी कारवाईप्रकरणी पक्षातून निष्काशीत करण्यात आले आहे. त्यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी हे कॉंग्रेसमध्ये सक्रिय नसल्याने त्यांच्या जाण्याने कॉंग्रेसचे काहीही नुकसान होणार नाही, असं महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com