अशोक चव्हाण पायउतार होताच सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द 

satish chaturvedi back in congress
satish chaturvedi back in congress

नागपूर :  माजी मंत्री व नागपूर शहरातील दबंग नेते सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन कॉंग्रेसने रद्द केले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर चतुर्वेदींच्या समर्थकांनी शाई फेकली होती. 

त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी अलीकडेच शिवसेनेत दाखल झाले आहेत. 

चतुर्वेदी आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे संबंध विकोपाला गेले होते. महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या समर्थकांना उमेदवारी दिली नसल्याने चतुर्वेदी नाराज झाले होते, त्यावरून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याही सोबत त्यांचा वाद झाला होता.

चतुर्वेदी, नितीन राऊत एकीकडे; तर मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे दुसरीकडे, असे दोन गट पडले होते. आजही दोन्ही गटांमध्ये दुफळी कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com