पुतण्यासाठी सतेज पाटील यांनी गायलेले गाणे घराघरात वाजू लागलाय 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी म्हटलेले गाणे घराघरात वाजू लागल आहे.
satej_patil_raturaj_patil
satej_patil_raturaj_patil

कोल्‍हापूर :  कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी म्हटलेले गाणे घराघरात वाजू लागल आहे.

या गाण्‍याच्‍या साथीने बनविलेल्‍या व्हिडीओमध्‍ये सतेज पाटील यांचा हटके अंदाज तरूणाईला भावला आहे. 'दक्षिणचा एकच आवाज... ऋतुराज... ऋतुराज' हे प्रचारगीत सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी संकल्पना पुढे आली असून त्‍याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.


निवडणुकीचा प्रचार म्हटला की ताई माई अक्का विचार करा पक्का असं आवाहन, पारंपरिक हलगीचा खणखणाट, आतषबाजी, पक्षांचे झेंडे, टोप्या, भव्य रॅली आणि उमेदवाराचा जयघोष, हेच नेहमी असणारे प्रचाराचे तंत्र आहे.

मात्र ऋतुराज पाटील यांच्‍यासाठी बनविलेल्‍या प्रचारगीताचा व्हिडीओ मात्र या सर्वांपेक्षा वेगळा ठरला आहे. यामध्‍ये आमदार सतेज पाटील यांनी 'युवकांचा आदर्श तू विजयाचा आगाज... नेतृत्व तडफदार.. तू आमचा ऋतुराज'... अशी लयबद्ध सुरूवात करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे.


या व्हिडीओमध्‍ये ऋतुराज पाटील हे साऊंड रेकॉर्डिस्टसह स्टुडिओमध्ये बसलेले दिसतात. याचवेळी पाठिमागून आमदार सतेज पाटील यांचा प्रवेश होतो आणि ते हेडफोन कानाला लावून गाणे म्‍हणण्‍यास सुरुवात करतात.

आमदार सतेज पाटील यांची गाणे म्‍हणण्‍यातील लयबद्धता, चेहऱ्यावरचा विश्वास आणि वज्रनिर्धार केलेल्या मुठीतील जिगर हे या व्हिडीओचे वैशिष्‍ठ ठरले आहे. याबरोबरच ऋतुराज यांना पदयात्रा, सभा असा सर्वत्र मिळणारा प्रतिसादही या व्हिडीओमध्‍ये  आहे. सध्या या व्हिडीओला सोशल मीडियावर तरुणाईच्या हजारो लाईक्स मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com