महाडिक गट आव्हानाचा विषय राहिला नाही!  

विधानसभेची तिकिटे जाहीर होऊ देत, एकदा गर्दी झालेल्या पक्षांची उमेदवारी जाहीर झाली की मग कळेल कोण येणार ते.
महाडिक गट आव्हानाचा विषय राहिला नाही!  

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाडिक गट हा पुर्वीपासूनच भाजपासोबतच होता. त्यामुळे तो आता आव्हानाचा विषय राहिलेला नाही, असा टोला कॉंग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला. 

विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित असून जिल्ह्यातील जागा वाटपाची चर्चा संपली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी आघाडीबाबत चर्चा सुरू आहे, त्यांचा निर्णय झाल्यानंतर जागा वाटप अंतिम होईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत, त्यांना महाडिक गट मिळाला आहे, या आव्हानांचा सामना कसा करणार या प्रश्‍नावर श्री. पाटील म्हणाले, महाडिक गट पुर्वीच भाजपासोबत होता. त्यांच्या आव्हानाचा विषय राहीलेला नाही. एनएसयुआयपासून माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस विचारसरणीत मी वाढलो आहे. अडचणीच्या काळात कॉंग्रेस बळकट करण्याची जी जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडणार आहे. विधानसभा निवडणुकी जवळ आल्या आहेत. जेवढी डागडुजी करता येईल त्यासाठी प्रयत्न करू. पुढील काळात माझ्या मनात ज्या कल्पना आहेत, त्या राबवल्या जातील.'

ते म्हणाले,"विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. त्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. सोशल मिडीयात आम्ही कमी पडतो हे खरे आहे. म्हणून जिल्हा कॉंग्रेसचा स्वतंत्र सोशल मिडीया सेल केला असून त्याद्वारे कॉंग्रेसने काय केले आणि सरकारची चुकीची कामे लोकांपर्यंत पोहचवली जातील. जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांची प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा झाली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील जागा कोणत्या हे निश्‍चित झाले आहे. श्री. शेट्टी यांचा विषय संपला की आघाडीची चर्चा संपुष्टात येईल. पण कॉंग्रेस, राष्ट्रवादीत कोणताही वाद नाही.'

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही पक्ष न सोडण्याची विनंती आपण केल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले,"तेथील जागा वाटपाची अडचण आहे, त्यातून निर्णय झाल्याचे समजते. वंचित आघाडीचा विषय संपलेला आहे, प्रदेश पातळीवरून ते जाहीरही करण्यात आले आहे. अनेक मंडळी कॉंग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. विधानसभेची तिकिटे जाहीर होऊ देत, एकदा गर्दी झालेल्या पक्षांची उमेदवारी जाहीर झाली की मग कळेल कोण येणार ते.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com