सतेज पाटलांनी साधली चंद्रकांतदादांशी बरोबरी..

satej patil equals with patil chandrakant
satej patil equals with patil chandrakant

कोल्हापूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनुत्सुकता दर्शवल्यानंतर कोल्हापुरच्या पालकमंत्रीपदी अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची नियुक्ती  झाली.  श्री. पाटील यांच्या नियुक्तीमुळे सलग दुसऱ्यांदा स्थानिक नेत्याकडेच हे पद आले आहे. यापुर्वी गेली पाच वर्षे या पदावर कोल्हापूरचे सुपुत्र व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काम केले आहे.
दरम्यान, यापुर्वी सतेज पाटील यांची भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती, ती रद्द करून त्यांच्याऐवजी या पदावर राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त, त्या पक्षाच्या मंत्र्यांकडे त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असे सुत्र आहे. यानुसार कोल्हापुरात कॉंग्रेसचे आमदार जास्त असल्याने 8 जानेवारी रोजी पालकमंत्रीपदी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. थोरात यांच्या नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्याने त्याठिकाणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचदिवशी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी म्हणून गृहराज्यमंत्री पाटील यांची नियुक्ती झाली होती. या नियुक्तीदिवशीच श्री. थोरात यांनी पक्षासह मंत्रीपदाची जबाबदारी असल्याचे सांगत पालकमंत्री पदासाठी अनुत्सुक असल्याचे सांगितले होते.

श्री. थोरात यांच्या नकारानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीत जिल्ह्यांची आदलाबदल करून ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत होती. त्याचबरोबर राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांचेही नाव या पदासाठी चर्चेत होते. या सर्व शक्‍यता फेटाळून लावत गृहराज्यंमत्री पाटील यांचीच या पदावर निवड झाली.
राज्यात 1995 ते 99 या काळात युतीचे सरकार असताना माजी मंत्री रामदास कदम पालकमंत्री होते. त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंत जिल्ह्याबाहेरील व्यक्तीकडेच हे पद होते. त्यानंतर (कै.) डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या पदावर काम केले. 2014 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पालकमंत्री झाले. श्री. पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदा हे पद जिल्ह्यातील मंत्र्याला मिळाले होते. आता सतेज यांच्या रूपाने पुन्हा एकदा या पदावर भूमीपुत्राची वर्णी लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com