'गोकुळ'कडून दूध उत्पादकांचे प्रतिलिटर 4 रुपये नुकसान

satej patil criticize gokul on milk rate
satej patil criticize gokul on milk rate

कोल्हापूर  :  गाय दुधासाठी राज्यातील सहकारी दूध संघ प्रतिलिटर 29 रुपये लिटर दर देत आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ मात्र प्रतिलिटर 25 रुपये दर देवून शेतकऱ्यांचे प्रतिलिटर 4 रुपये नुकसान करत आहे, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.

गोकुळमधील सत्ता बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. तरीही, दूध दर वाढ न झाल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारही आमदार पाटील यांनी दिला. कळंबा जेल समोर असणाऱ्या तपोवन मैदान येथे आजपासून 'सतेज कृषी प्रदर्शन 2019' सुरूवात झाली. यावेळी श्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार पाटील म्हणाले, गोकुळच्या गाय दुधासाठी शेतकऱ्यांना जास्ती-जास्त दर मिळाला पाहिजे, अशी वारंवार मागणी केली जाते. तरीही, राज्यातील इतर दूध संघांच्या तुलनेत गोकुळे कमी दर देत आहे. यापार्श्‍वभूमीवर संघाचे अध्यक्ष व संचालकांची भेट घेवून दरवाढीसाठी आवाहन केले जाईल. तरीही, दर वाढ झाली नाही तर मात्र तीव्र आंदोलन केले जाईल. गोकुळमधील प्रशासकीय खर्च कमी करावा, अशी मागणी करत आलो आहे. संचालकांवरील खर्चही कमी झाला पाहिजे. एकीकडे दुधाची टंचाई असताना दूधाच्या उपपदार्थांना आता चांगले दर मिळत असल्याचे चित्र आहे. हे लक्षात घेवून गोकुळने गाय दूधासाठी दरवाढ जाहीर केली पाहिजे. दरम्यान, शेतकऱ्यांना दूध दरवाढ मिळावी या भूमिकेतून दिलेल्या इशाऱ्यामुळे पून्हा एकदा गोकुळचे वातावरण तापणार असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com