satej patil become of guardian minister of kolhapur | Sarkarnama

कोल्हापूरचे पालकमंत्रीपद सतेज पाटलांकडेच

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

...

पुणे : कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी सतेज पाटील यांची नियुक्ती अखेरीस करण्यात आली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्याने ही जागा रिक्तच होती.

या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यात स्पर्धा होती. मुश्रीफ यांना नगर जिल्ह्याचे आणि पाटील यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाहीर झाले होते. मात्र यावर काॅंग्रेसच्या वर्तुळातून नाराजी व्यक्त झाली. अखेरीस थोरात यांनीच यावर तोडगा काढला.

विश्वजित कदम यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी नेणण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांना भंडारा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख