satej patil and hasan mushrif | Sarkarnama

निधी आणताना आमच्याकडेही लक्ष द्या : सतेज पाटील

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 जानेवारी 2020

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्री मंडळात श्री. मुश्रीफ यांचे फायनलच होते, फक्त माझ्यासह यड्रावकर यांना संधी कशी मिळणार याची उत्सुकता होती. श्री. यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना संधी मिळाली. मी 14 वर्षे आमदार, चार वर्षे मंत्री म्हणून केलेल्या कामामुळे माझीही वर्णी मंत्रिमंडळात लागली, असे गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले. राज्य सरकारचे मंत्रिमंडळ म्हणजे जागतिक दर्जाची टीम आहे. जागतिक क्रिकेट टिममध्ये ज्याप्रमाणे चांगला फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक घेतले जातात तशीच लोक मंत्रिमंडळात आहेत. कॉंग्रेसमधून अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील तर राष्ट्रवादीतून दिग्गज लोक मंत्री म्हणून आले आहेत, असे श्री. मुश्रीफ म्हणाले. 

कोल्हापूर : माझ्याकडे आणि यड्रावकर यांच्याकडे मिळून 11 खाती आहेत. त्यामुळे मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. ग्रामविकास हे अतिशय महत्त्वाचे खाते आहे, त्याचे राज्यमंत्री मला करा असे मी वरिष्ठांना सांगत होतो. स्वर्गीय आर. आर. पाटील, जयंत पाटील यांच्यासारख्या लोकांनी हे खाते सांभाळले आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे. या खात्याच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे मोठा निधी जिल्ह्याला आणतील. राज्याला दहा रूपये दिले तर कोल्हापुरला ते 50 रूपये आणतील पण त्याचवेळी त्यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्री मंडळात श्री. मुश्रीफ यांचे फायनलच होते, फक्त माझ्यासह यड्रावकर यांना संधी कशी मिळणार याची उत्सुकता होती. श्री. यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना संधी मिळाली. मी 14 वर्षे आमदार, चार वर्षे मंत्री म्हणून केलेल्या कामामुळे माझीही वर्णी मंत्रिमंडळात लागली, असे गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले. राज्य सरकारचे मंत्रिमंडळ म्हणजे जागतिक दर्जाची टीम आहे. जागतिक क्रिकेट टिममध्ये ज्याप्रमाणे चांगला फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक घेतले जातात तशीच लोक मंत्रिमंडळात आहेत. कॉंग्रेसमधून अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील तर राष्ट्रवादीतून दिग्गज लोक मंत्री म्हणून आले आहेत, असे श्री. मुश्रीफ म्हणाले. 

ना खाऊंगा, खाने दुँगा 
गेली पाच वर्षे हुकुमशाही पध्दतीने सरकारचा कारभार राहीला. व्यथा कुणी मांडायच्या नाहीत, रस्त्यावर कोणी उतरायचे नाही अशी परिस्थिती होती, त्यातून लोकांत प्रचंड रोष निर्माण झाला होता. आता हे सरकार आपलं सरकार असल्याची भावना लोकांत आहे म्हणून आल्यापासून शुभेच्छा देण्यासाठी लोकांची रांग लागली आहे. जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्‍न तर पूर्ण करूच पण "ना खाऊँगा, ना खाने दुँगा' हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाक्‍य पूर्ण करून दाखवू, असे आश्‍वासन श्री. मुश्रीफ यांनी दिले. 

संजयबाबांनाही थांबवले नाही 
गेल्या पाच वर्षात बॅंकेत राजकारण आणले नाही. चांगल्या संस्थांचे कर्ज रोखले नाही. कागल तालुक्‍यातही हे राजकारण केले नाही, याठिकाणी प्रा. मंडलिक आहेत त्यांनाही याची माहिती आहे. यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी संजय बाबांनाही थांबवले नाही असे म्हणताच श्री. मुश्रीफ यांनीही " होय, संजयबाबांनासुध्दा कर्ज थांबवले नाही, असे सांगत कागलचे राजकीय गुपित उघड केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख