कोल्हापूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी सतेज पाटील, आवळे चर्चेत

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे यांची नांवे चर्चेत आली आहेत. दरम्यान, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ज्यांनी आवाडे यांनाच बळ दिले ते मात्र त्यांच्या राजीनाम्याने तोंडघशी पडले आहेत.
Satej Patil - Jaywantrao Awale
Satej Patil - Jaywantrao Awale

कोल्हापूर :  माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे यांची नांवे चर्चेत आली आहेत. दरम्यान, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ज्यांनी आवाडे यांनाच बळ दिले ते मात्र त्यांच्या राजीनाम्याने तोंडघशी पडले आहेत.

सलग 50 वर्षे कॉंग्रेसशी एकनिष्ठ अशी आवाडे यांची ओळख होती. इचलकरंजीत कॉंग्रेस म्हणजे आवाडे आणि आवाडे म्हणजे कॉंग्रेस असेच समीकरण होते. या जोरावर त्यांना इचलकरंजीच्या महापौरपदापासून आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदही पक्षाने बहाल केले. कॉंग्रेसमधील एक बडे प्रस्थ असलेल्या आवाडे यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला तो मोठा धक्का समजला जातो.

कॉंग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष पदावरूनचआवाडे विरूध्द पी. एन. असा वाद रंगला होता. यातून सात वर्षापुर्वी झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांचा पराभव झाला. त्यावेळी झालेल्या हाणामारीनंतर या दोघांतील मतभेद टोकाला पोहचले. पण जिल्हाध्यक्ष पदाची पी. एन. यांची मुदत संपल्यानंतर नव्या अध्यक्ष निवडीवेळी प्रकाश आवाडे यांचे एकमेव नांव समोर होते. 

राष्ट्रीय पातळीवर आवाडे हे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जात होते. त्यातून नऊ महिन्यापुर्वी प्रकाश आवाडे यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली. या निवडीच्या माध्यमातून त्यांनी पी. एन. यांनाच शह दिला होता. या राजकारणात काहींनी आवाडे यांना बळ देऊन पी. एन. यांची अडचण करण्याचा प्रयत्न केला, पण तेच आज आवाडे यांच्या राजीनाम्यामुळे तोंडघशी पडले आहेत.

आवाडे यांच्या राजीनाम्यामुळे नवा जिल्हाध्यक्ष कोण याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. राज्यात आणि केंद्रात असलेले भाजापाचे सरकार, राज्यात दोन्ही कॉंग्रेसमधून सुरू असलेली नेत्यांची मोठ्या प्रमाणात गळती या पार्श्‍वभुमीवर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे तरूण नेतृत्त्व जिल्ह्यात गरजेच आहे. त्यातून आमदार सतेज पाटील व माजी खासदार जयवंतराव आवळे यांची नांवे चर्चेत आली आहेत. ऐनवेळी या दोघांऐवजी माजी प्रदेश सरचिटणीस अॅड. सुरेश कुराडे यांचीही वर्णी या पदावर शक्‍य असली तरी त्यांच्या नावाला स्थानिक पातळीवर विरोध होण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com