satara zp politics | Sarkarnama

सभापती निवडीत कोण होणार एप्रिल फूल ? 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 30 मार्च 2017

जिल्हा परिषदेतील विषय समितींच्या सभापतींच्या निवडी एक एप्रिलला होत आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदातून डावललेल्यांना सभापतिपदाची आशा आहे. आता ही नावे बारामतीवरून निवडी आधी तासभर ठरणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या यानिवडीत कोण एप्रिल फूल होणार, याचीच उत्सुकता आहे. 

सातारा : जिल्हा परिषदेतील विषय समितींच्या सभापतींच्या निवडी एक एप्रिलला होत आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदातून डावललेल्यांना सभापतिपदाची आशा आहे. आता ही नावे बारामतीवरून निवडी आधी तासभर ठरणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या यानिवडीत कोण एप्रिल फूल होणार, याचीच उत्सुकता आहे. 

मुंबईत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर सभापती पदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. विधान परिषदेचे सभापती
रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व दीपक चव्हाण वगळता उर्वरित सर्व आमदारांनी आपापल्या तालुक्‍यातील इच्छुकांसाठी सभापती पदाची
मागणी केली आहे. पण सव्वा वर्षासाठी सभापती पदे असल्याने पहिली संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्यातच सभापती निवडीचा कार्यक्रम
एक एप्रिलला होत आहे. याच दिवशी पुन्हा सर्व आमदार एकत्र बसून सभापतींची बारामतीवरून अंतिम होऊन आलेली नावे निश्‍चित करतील. त्यामुळे एप्रिल
महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोण फूल होणार आणि कोण सभापती पदावर विराजमान होणार याचीच सर्वांत उत्सुकता आहे. 

असे आहेत इच्छुक : 

शिक्षण व कृषी : राजेश पवार (म्हावशी गट, ता. पाटण), मानसिंगराव जगदाळे (मसूर, ता. कऱ्हाड), मनोज पवार (खेड बुद्रूक, ता. खंडाळा) 

महिला व बालकल्याण सभापती : भारती पोळ (गोंदवले गट, ता. माण) 

समाजकल्याण : शिवाजी सर्वगोड (औंध गट, ता. खटाव), बापू जाधव (गोकूळ तर्फ हेळवाक, ता. पाटण), मधू कांबळे (खेड, ता. सातारा), वनिता पलंगे (उंब्रज, ता. पाटण), नीता आखाडे (भिलार, ता. महाबळेश्‍वर), रंजना डगळे (यशवंतनगर, ता. वाई), कल्पना खाडे (निमसोड, ता. खटाव) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख