satara zp | Sarkarnama

विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी भाजपची फिल्डिंग 

सरकारनामा न्यूजब्युरो 
गुरुवार, 9 मार्च 2017

दुसऱ्या क्रमांकासाठी कॉंग्रेस व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
सभागृहात विरोधीपक्ष नेता कोणत्या पक्षाचा होणार याची उत्सुकता आहे. आजपर्यंत कॉंग्रेसने विरोधी पक्षाची भूमिका बजावली आता त्यांची जागा भारतीय जनता
पक्ष घेण्याच्या तयारीत आहेत.

सातारा : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 39 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. पण दुसऱ्या क्रमांकासाठी कॉंग्रेस व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
सभागृहात विरोधीपक्ष नेता कोणत्या पक्षाचा होणार याची उत्सुकता आहे. आजपर्यंत कॉंग्रेसने विरोधी पक्षाची भूमिका बजावली आता त्यांची जागा भारतीय जनता
पक्ष घेण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी अपक्ष व इतरांशी बोलणी सुरू केली आहे. 

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडे 39 अधिक एका अपक्षाचा पाठिंबा असे 40 सदस्य आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे सध्या सात व पहिल्यांदाच
सभागृहात आलेल्या भाजपकडेही सात सदस्य आहेत. तर शिवसेना दोन, अपक्ष दोन आणि विविध आघाड्यांचे सात सदस्य आहेत. हे सर्व बलाबल पाहता राष्ट्रवादीच्या
सत्तेविरोधात विरोधीपक्षाची भूमिका पार पाडण्यासाठी कॉंग्रेस सोबत भारतीय जनता पक्षाचे बलाबल आहे. त्यामुळे आता या दोघांचे बलाबल एकसारखेच असल्याने
कॉंग्रेसचा की भाजपचा विरोधीपक्ष नेता होणार, याची उत्सुकता आहे. सध्यातरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आपलाच सभागृह
नेता असावा या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यासाठी अपक्ष व आघाड्यांच्या सदस्यांचा पाठिंबा मिळवून संख्याबळ वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख