satara zp | Sarkarnama

घडल्या बिघडल्याचा राष्ट्रवादी करणार लेखाजोखा 

सरकारनामा न्यूजब्युरो 
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय घडलं काय बिघडलं, याचा लेखाजोखा राष्ट्रवादीचे नेते करणार आहेत. जिल्हा परिषदेत मिळविलेल्या
निर्विवाद सत्तेनंतर नवीन सदस्यांचा परिचय आणि त्यातूनच पदाधिकाऱ्यांची चाचपणी अशा दुहेरी हेतूने येत्या गुरुवारी (ता. 2) पक्षाने राष्ट्रवादी भवनात बैठक
बोलावली आहे. 

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय घडलं काय बिघडलं, याचा लेखाजोखा राष्ट्रवादीचे नेते करणार आहेत. जिल्हा परिषदेत मिळविलेल्या
निर्विवाद सत्तेनंतर नवीन सदस्यांचा परिचय आणि त्यातूनच पदाधिकाऱ्यांची चाचपणी अशा दुहेरी हेतूने येत्या गुरुवारी (ता. 2) पक्षाने राष्ट्रवादी भवनात बैठक
बोलावली आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळणार का, याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. पण सर्वांचे अंदाज फोल ठरवत राष्ट्रवादीने जिल्हा
परिषदेवर सलग चौथ्यांदा सत्ता मिळविली आहे. या विजयामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे स्पष्ट झाले. पण भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचा
सभागृहात चंचुप्रवेश मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. 

एकीकडे मिळालेले यश आणि दुसरीकडे काही महत्त्वाचे गट हातातून सुटून ते भाजपच्या ताब्यात गेले आहेत. तसेच काही प्रमुख नेत्यांचे नातेवाइकांनाही पराभवाचा
धक्का बसला आहे. एकूण या निवडणुकीत काय घडलं आणि काय बिघडलं याचा लेखाजोखा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी (ता. 2) सर्व नवीन सदस्यांची
बैठक बोलावली आहे. यावेळी सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित असतील. ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील, पक्षप्रतोद आमदार शशिकांत
शिंदे हे सर्वांचा अंदाज घेऊन उपस्थित सदस्यांतूनच पदाधिकारी होण्यास कोण लायक आहेत, याची चाचपणी करणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख