satara will welcome cm with kandi pedha | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी साताऱ्यात मोदींच्या कंदी पेढ्याचा हार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 सप्टेंबर 2019

भाजपची महाजनादेश यात्रा आज दुपारी साताऱ्यात येत आहे, या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यासाठी माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खास सातारी कंदी पेढ्याचे दोन हार तयार करून घेतले आहेत. तसेच कोरेगावचे नेते महेश शिंदे यांनीही एक हार करून घेतला आहे.

सातारा : भाजपची महाजनादेश यात्रा आज दुपारी साताऱ्यात येत आहे, या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यासाठी माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खास सातारी कंदी पेढ्याचे दोन हार तयार करून घेतले आहेत. तसेच कोरेगावचे नेते महेश शिंदे यांनीही एक हार करून घेतला आहे.

सातारा शहरात भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी साताऱ्याचे राजघराणे आतुर झाले आहे. शहरात विविध ठिकाणी महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. साताऱ्याचा गोडवा समजला जाणारा कंदी पेढ्याचा सुमारे दीड किलोचा हार आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आला आहे. येथील योगेश स्वीटचे मोदी पेढीवले योगेश मोदी यांच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे हार करण्यात येतात. 

आज माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि महेश शिंदे यांनी दीड किलोचा कंदीपेढ्याचा हार खास मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बनवून घेतला आहे.
याबरोबर उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी ही सातारी कंदी पेढे नेल्याचे मोदी यांनी नमूद केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख