Satara Udayan raje Shivendra sinh raje politics NCP | Sarkarnama

खासदारांची दहशत मोडून काढा : शिवेंद्रसिंहराजे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 मार्च 2017

सातारा : खासदारांना घाबरू नका, त्यांची दहशत आपण मोडीत काढली आहे. त्यांच्या गाडीवर दगडे पडली याचा अर्थ त्यांची दहशत कमी झाली आहे. यापुढे खासदारांच्या दहशतीपुढे न झुकता ती मोडून काढा', असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

सातारा : खासदारांना घाबरू नका, त्यांची दहशत आपण मोडीत काढली आहे. त्यांच्या गाडीवर दगडे पडली याचा अर्थ त्यांची दहशत कमी झाली आहे. यापुढे खासदारांच्या दहशतीपुढे न झुकता ती मोडून काढा', असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या स्वागत व सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, दादाराजे खर्डेकर, सत्यजित पाटणकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शशिकांत शिंदे म्हणाले, बदलाचे वातावरण असताना जिल्ह्यातील जनतेने यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावरील विश्‍वास सार्थ ठरविला आहे. जिल्हा परिषदेत 40 जागा व दहा पंचायत समिती जिंकून आम्ही यश मिळविले आहे. जनतेने दिलेला कौल मानून आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार निवडून आलेल्या सदस्यांनाच विकास कामे करताना झुकते माप दिले जाईल. मागील वेळी झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून आम्ही काळजी घेणार असून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. तसेच पदाचा कालावधीही योग्य असेल. खासदार उदयनराजेंना विचारात न घेता आम्ही ही निवडणूक यशस्वी पार पाडली आहे. निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतलेल्यांना पुन्हा प्राधान्य दिले जाणार नाही. पक्षासाठी कष्ट घेतलेल्यांना पदाधिकारी निवडीत स्थान दिले जाईल. सभागृहात संजीवराजे सर्वांत अनुभवी व ज्येष्ठ असल्याने त्यांनीच आता सर्वांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेची वाटचाल करावी, असे सूचक विधान श्री. शिंदे यांनी केले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, खासदारांना घाबरू नका. त्यांची दहशत आपण मोडीत काढली आहे. त्यांच्या गाडीवर दगडे पडली याचा अर्थ त्यांची दहशत कमी झाली आहे. त्यांना आम्ही साताऱ्यातच अडकवून ठेवले त्यामुळे बाकीच्या तालुक्‍यात निवडणुकीचा मार्ग सोपा झाला. यापुढे खासदारांच्या दहशतीपुढे न झुकता ती मोडून काढा. तसेच विरोधकांचे आजपर्यंत खूप लाड केले. आता त्यांना बाजूला ठेवून पक्षाच्या सदस्यांसाठी विकास कामे राबविण्यावर भर द्या, असा सल्ला त्यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख