satara-shivsena-narendra-patil-water-issue | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

...तर जलसंपदाचे कार्यालय पेटवून देऊ : नरेंद्र पाटील 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

केंद्रीय जलआयोगाच्या उद्याच्या (मंगळवारी) बैठकीत जिहे-कटापूर योजनेसाठी भरीव निधी मंजूर होईल, अशी आशा आहे. तसे न झाल्यास कशाचीही पर्वा न करता शिवसेना कार्यकर्ते जलसंपदा विभागाचे येथील कार्यालय पेटवून देतील. अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रात फिरकू दिले जाणार नाही. पाण्याअभावी पिचलेला आमचा शेतकरी महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून कमी पाण्यावर येणाऱ्या अफू आणि गांजाची शेती करतील, असा उद्धेग शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. 

सातारा : केंद्रीय जलआयोगाच्या उद्याच्या (मंगळवारी) बैठकीत जिहे-कटापूर योजनेसाठी भरीव निधी मंजूर होईल, अशी आशा आहे. तसे न झाल्यास कशाचीही पर्वा न करता शिवसेना कार्यकर्ते जलसंपदा विभागाचे येथील कार्यालय पेटवून देतील. अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रात फिरकू दिले जाणार नाही. पाण्याअभावी पिचलेला आमचा शेतकरी महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून कमी पाण्यावर येणाऱ्या अफू आणि गांजाची शेती करतील, असा उद्धेग शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत सातारा शासकीय विभामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारच्या कार्यपद्धतीचा नेहमीच्या शैलीत समाचार घेतला. 

जिहे-काटापूर योजनेबाबत बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, "गेली 20 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या या योजनेची आजवरच्या केंद्र आणि राज्य सरकारांनी उपेक्षाच केली. आमचे नेते खासदार गजानन किर्तीकर, संपर्क नेते दिवाकर रावते, पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा केला. सेना पदाधिकाऱ्यांनी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्फत केंद्र शासनाकडे आणि केंद्रीय जल आयोगाकडे जिहे-कटापूर योजनेच्या मान्यतेसाठी प्रयत्न केले. उद्या (मंगळवारी) केंद्रीय जल आयोगाची दिल्लीत होणाऱ्या बैठकीत निधी मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे.'' 

या योजनेबाबत आजवरचा शासनाचा अनुभव फार चांगला नाही. उद्या केंद्रीय जल आराखड्यास मान्यता न मिळाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शासन पाणी पुरवू शकत नसेल तर आम्हाला शासनाची गरज नाही. यापुढे जिल्ह्यात कोणताही प्रकल्प करु देणार नाही, असा इशाराही श्री. पाटील यांनी यावेळी दिला.
 
यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव, भानुदास कोरडे, सचिन झांजुर्णे, दिनेश देवकर, यशवंत जाधव, रवींद्र फाळके, अमिन आगा, संजय नलवडे आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख