पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिला आमदार म्हणून बाळासाहेबांचा लाडका झालो : सदाशिव सपकाळ

सदाशिव सपकाळ यांचे वडील हे मुंबईत माथाडी कामगार होते. त्यावेळी सदाशिव सपकाळ हे टॅक्‍सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. शिवसेनेशी असलेली नाळ कायम ठेवत सदाशिव सपकाळ जावलीत आले व त्यांनी पक्ष संघटना स्थापनेत आघाडी घेतली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना पक्ष, संघटना वाढविण्याचे त्यांचे काम पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता असूनही सदाशिव सपकाळ यांना उमेदवारी दिली होती.
Shivsena EX MLA Sadashiv Sapkal with Balasaheb Thakrey
Shivsena EX MLA Sadashiv Sapkal with Balasaheb Thakrey

सातारा :  शिवसेनेचे 1995 च्याच्या विधानसभा निवडणुकीत मला दुसऱ्यांदा तिकिट मिळाले आणि मी विजयी झालो. साताऱ्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील मी शिवसेनेचा पहिला आमदार झालो. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: दूरध्वनीवरून संपर्क करून माझे अभिनंदन केले. तसेच मातोश्रीवर भेटायलाही बोलावले. तेथे गेल्यावर त्यांनी मला आशिर्वाद दिलाच तसेच मीनाताई ठाकरे यांच्या हस्ते माझे औक्षणही केले. मी बाळासाहेबांचा इतका लाडका आमदार होतो, अशा शब्दात माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना आज उजाळा दिला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन असून यानिमित्ताने शिवसेनेचा पहिला आमदार होण्याचा मान मिळालेले जावलीचे नेते सदाशिव सपकाळ यांनी श्री. ठाकरे यांच्याविषयीचा आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ''सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्या पाव रोवण्याचे काम सर्वप्रथम शिवसेनेने केले. 1995 पर्यंत कॉंग्रेस आणि कॉंग्रेसतंर्गत गटतटाचाच आमदार व्हायचा पण 1995 मध्ये सर्व प्रथम शिवसेनेचा आमदार जावली विधानसभा मतदारसंघातून निवडुन आला. 1983-84 पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यात आपला संपर्क वाढविला होता. काही निवडक कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी सातारा जिल्ह्यात शाखा सुरू करण्यास सुरवात केली. त्यानंतर शिवसेनेत एक एक करत कार्यकर्ते व पदाधिकारी वाढू लागले.''

ते पुढे म्हणाले, ''मुंबईतून जावलीत येऊन मी शिवसेना पक्ष, संघटना वाढविण्यावर भर दिला होता. 1990 च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेने राज्यभर उमेदवार देण्यास सुरवात केली. त्यावेळी बाळसाहेब ठाकरे यांचे साताऱ्यातील संपर्क दौरे वाढले आणि शाखांचा विस्तार झाला. 1990 ला मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली. त्यावेळी अनेक दिग्गज नेते मंडळी पैसे देऊन जावलीतून निवडणुक लढण्यास तयार होती. पण बाळासाहेबांनी ज्यांनी माझी संघटना उभी केली, त्याला माझे पहिले प्राधान्य राहिल, असे सांगत मला उमेदवारी दिली. पहिल्यांदा 1990 ला मी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. पहिल्यांदा यश आले नाही. 1995 ला ही त्यांनी आपला तोच शब्द कायम ठेवत माथाडी कामगाराच्या मुलालाच मी दुसऱ्यांदा तिकिट देणार असे श्री. ठाकरे यांनी सांगितले. मला दुसऱ्यांदा तिकिट मिळाले आणि मी विजयी झालो. साताऱ्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील मी शिवसेनेचा पहिला आमदार झालो.''  

''यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: दूरध्वनीवरून संपर्क करून माझे अभिनंदन केले. तसेच मातोश्रीवर भेटायलाही बोलावले. तेथे गेल्यावर त्यांनी मला आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. तसेच मीनाताई ठाकरे यांच्या हस्ते माझे औक्षणही केले. मी बाळासाहेबांचा लाडका आमदार होतो. त्यावेळेस त्यांनी माझ्या साताऱ्यातील आमदाराला विचारल्याशिवाय मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याने या भागातील कोणताही निर्णय घ्यायचा नाही, असे ठणकावून सांगितले होते. पश्‍चिम महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता कशी वाढेल, असे बाळासाहेब ठाकरे यांनी मला विचारले होते. त्यावेळी मी त्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत बोललो होतो. त्यांनी तो शब्द पाळला आणि महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या स्थापनेत माझा आणि ठाकरे साहेबांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देते वेळी महाबळेश्‍वरला कार्यक्रमाच्या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी श्री. ठाकरे यांनी माझ्यावर सोपविली होती.'' असे सांगत सपकाळ यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. 

टॅक्‍सी ड्रायव्हरला उमेदवारी
सदाशिव सपकाळ यांचे वडील हे मुंबईत माथाडी कामगार होते. त्यावेळी सदाशिव सपकाळ हे टॅक्‍सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. शिवसेनेशी असलेली नाळ कायम ठेवत सदाशिव सपकाळ जावलीत आले व त्यांनी पक्ष संघटना स्थापनेत आघाडी घेतली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना पक्ष, संघटना वाढविण्याचे त्यांचे काम पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता असूनही सदाशिव सपकाळ यांना उमेदवारी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com