कर्जमुक्‍ती द्या, "इर्मा' लागू करा! - satara shetkari morcha | Politics Marathi News - Sarkarnama

कर्जमुक्‍ती द्या, "इर्मा' लागू करा!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जून 2017

निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यावेळी शंकरराव गोडसे, शंकर शिंदे, पंजबाराव पाटील, सुनील काटकर, धर्मराज जगदाळे, विकास जाधव, ऍड. कमल सावंत, गितांजली कदम, नगरसेविका स्नेहा नलवडे, धनश्री महाडीक, परवीन पानसरे, कल्पक जाधव यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
 

कर्जमुक्‍ती द्या, "इर्मा' लागू करा! 

सातारा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, या प्रमुख मागणीसह हमीभाव, निवृत्ती वेतन तसेच इर्मा कायदा लागू करावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान क्रांतीसह सर्व शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

किसान क्रांती, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, बळीराज शेतकरी संघटना, भूमाता शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पोवईनाका येथून मोर्चास सुरवात केली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चात शेतकऱ्यांनी बैलगाड्या, मेंढरं तसेच ट्रॅक्‍टर आणले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडविला. मोजक्‍याच प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात सोडण्यात आले. त्यानंतर डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला स्वामिनाथन आयोगाप्रमाणे हमीभाव, ठिबक सिंचन व तुषार संचासाठी अनुदान, शेतकऱ्यांसाठी निवृत्तिवेतन, दुधाला सुमारे 60 रुपये लिटर भाव, कृषिपंपाला मोफत वीज मिळण्यासाठी शेतकरी बेमुदत संपावर आहेत. या संपास शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी कृती बचाव समिती, महाराष्ट्र किसान सभा, अन्नदाता शेतकरी संघटना तसेच राज्यातील इतर संघटनांनी या पाठिंबा दिला आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख