तर नितीन भरगुडेंचा आसाराम बापू झाला असता : उदय कबुले

..
तर नितीन भरगुडेंचा आसाराम बापू झाला असता : उदय कबुले

सातारा : मकरंद आबा नसते तर नितीन भरगुडे पाटील तुमचा तेव्हाच आसाराम बापू झाला असता. तुम्ही जे आज खंडाळा खवळला म्हणताय ते खवळलेला खंडाळा तुम्हाला त्यावेळीच दिसला असता. खंडाळयाच्या जनतेने त्याचवेळी तुम्हाला आसाराम बापूसारखाच दगडाने आणि चपलीने ठेचला असता, असा टोला जिल्हा परिषदेचे सदस्य उदय कबुले यांनी नितीन भरगुडे यांना लगावाला.

पळशी (ता. खंडाळा) येथील सभेत नितीन भरगुडे-पाटील यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीकास्त्र सोडले होते. त्याला उदय कबुले यांनी जशास तसे उत्तर दिले.

ते म्हणाले, एकाची टोपी दुस-याला हा तुमचा धंदा, सकाळी एकाबरोबर, दुपारी दुस-याबरोबर तर रात्री तिस-याबरोबर हे तुमचे आयुष्यभराचे निष्ठेचे उद्योग, असल्या उचापती केल्यामुळेच जिल्हा परिषदेला जनतेने तुम्हाला उताणे केले.

जनतेने तुम्हाला पाडल्यापासून मला पाडला, मला पाडला, असा गळा काढत तुम्ही डोक्‍यावर पडल्यासारखे बरळू लागला आहात. त्यामुळे मकरंद आबाला पाडायचे सोडून द्या, आता ग्रामपंचायतीला उभे रहा, पळशीचाच पैलवान तुम्हाला हिसका दाखवेल.

शिरवळ जिल्हा परिषद गटातील जनतेनेच हा भस्मासूर गाडायचा निर्णय घेतला. तुम्ही काय शे पाचशे मतांनी पडला नाही. तर सुमारे सहा हजार मतांनी तुम्हाला जनतेने आस्मान दाखवले आहे.

सकाळी उठल्यापासून, संध्याकाळापर्यंत फक्त खोटे बोलायचे, याच्या चुगल्या, त्याला, त्याच्या चुगल्या याला या तुमच्या धंद्याला शिरवळ जिल्हा परिषद गटातील जनता कंटाळली होती. खोटं बोलायचं रेटून बोलायचं या नीतीमुळे जनतेने तुमची उचलबांगडी केली.

तुम्ही स्वतःला देवाचे अवतार समजत होता, माझा कधीच पराभव होणार नाही, असा गर्व तुम्हाला होता. मात्र, तुमच्या बतावण्यांना जनतेने जागा दाखवली. खापर मात्र तुम्ही मकरंद आबांवर फोडत आहात. पराभवानंतरही अनेकदा तुम्ही सेटलमेंटचे प्रयोग केले, असा टोलाही कबुले यांनी लगावला.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com