satara nangre patil at vaduj | Sarkarnama

अवैध दारू विक्री करणाऱ्यांची तडीपारी होणार : नांगरे-पाटील 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

वडूज (सातारा) : खटाव तालुक्‍यातील सात गावांत मतदानाने दारूबंदी झाली आहे. तर अन्य गावांत अवैधरित्या दारूविक्री प्रकरणात केवळ एकाच गुन्ह्यात शिक्षा झाल्याचे आढळते. त्यामुळे अशा अवैध दारूविक्रीच्या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्यास तडीपार करण्याचे आदेश दिले जातील, अशी सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. 

श्री. पाटील यांनी खटाव पोलिस उपअधीक्षक कार्यालय व पोलिस ठाण्यास भेट देऊन तपासणी केली. त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, नगराध्यक्षा शोभा माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी श्री. पाटील यांनी पोलिस प्रशासनाबद्दल नागरिकांची मते व अपेक्षा जाणून घेतल्या. शाळा, महाविद्यालय परिसरात गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री होत आहे. त्याविरोधात कडक कारवाई करावी, शहरात सम-विषम पार्किंग सुरू करावे, उपअधीक्षक कार्यालय मध्यवर्ती भागात स्थलांतरित करावे, दारूबंदीबाबत ठोस कारवाई करावी, अशा मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या. 

पोलिस ठाण्यासाठी चांगले वाहन, पुरेसे कर्मचारी, वसाहतींची डागडुजी, शाळा आणि महाविद्यालय परिसरात गतिरोधक, बस स्थानक परिसरात भुरट्या चोरट्यांवर कडक कारवाई, जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील घाटात पोलिस चौकी सुरू करावी, अतिक्रमणांना वेळीच पायबंद व वाळू माफियांकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या दमदाटीबाबत ठोस कार्यवाही करावी आदी मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख