दुर्लक्ष केल्यास खळखट्याक आंदोलन होईल : शिवेंद्रसिंहराजे (व्हिडिओ)

महामार्गावरील खड्डे आणि कारपेटींगच्या कामाकडे दूर्लक्ष केल्याने नाईलाज म्हणून आम्हाला आनेवाडी टोलनाका लोकशाहीच्या मार्गाने बंद पाडला आहे. पण आगामी काळात खळखट्याक आंदोलन होईल, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
Shivendraraje Agitation Against Problems on Satara Road
Shivendraraje Agitation Against Problems on Satara Road

सातारा : महामार्गावरील खड्डे आणि कारपेटींगच्या कामाकडे दूर्लक्ष केल्याने नाईलाज म्हणून आम्हाला आनेवाडी टोलनाका लोकशाहीच्या मार्गाने बंद पाडला आहे. पण आगामी काळात खळखट्याक आंदोलन होईल, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

महामार्गावर सुविधा देण्यासोबत खड्डे आणि कारपेटींगच्या कामाकडे महामार्ग प्राधीकरणाने दुर्लक्ष केल्याने साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज आपल्या समर्थकांसह आनेवाडी टोलनाक्‍यावर जाऊन 'महामार्गाची कामे करा अन्यथा टोल बंद करा,' अशा घोषणा देत टोल वसुली बंद केली. शिवेंद्रसिंहराजे व त्यांच्या समर्थकांनी टोलनाक्‍यावर ठिय्या मारला. यावेळी सर्वांनी अन्यायकारक टोल बंद कसा असे लिहिलेल्या टोप्या सर्वांनी घातल्या होत्या.

यावेळी आपली भूमिका मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत खड्डे भरून कारपेटींग करतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. सुविधा नसल्याने टोल बंद करावा, अशी सातारकरांची इच्छा आहे. त्यानुसार आम्ही हे आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे. टोलनाका सर्वांसाठी खुला केला आहे. आम्ही टोल वसुली करून देणार नाही. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यापध्दतीने खेड शिवापूरचा टोलनाका बंद केला. तसा साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवून आनेवाडी टोलनाका बंद करावा.''

''टोलनाक्‍यावर सुविधा नाहीत, रस्त्यात खड्डे पडले आहेत, नव्याने बांधलेले पुल तुटलेत, करोडो रूपयांची कामे करता व प्रत्यक्षात कामे निकृष्ठ दर्जाची होत आहेत. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. आता अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. आम्ही आज लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती, मोडतोड किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ देऊ नका. त्यामुळे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. यानंतरही रिलायन्स कंपनी आणि महामार्ग प्राधीकरणाने दुर्लक्ष केल्यास खळखट्याक आंदोलन केले जाईल,'' असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com