satara mla shambhuraj desai son story | Sarkarnama

आमदार शंभूराज देसाईंची छाती अभिमानाने फुगली...मुलाची संशोधन क्षेत्रात झेप! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सातारा : पाटण मतदारसंघातील शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज यांनी अभियांत्रिकी शिक्षणातून बांधकाम क्षेत्राशी संबधित केलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. तीन पिढ्या यशस्वी राजकारण करत असलेल्या देसाई घराण्याला यशराजच्या संशोधनातील यशाचे मोठे कौतुक आहे. 

सातारा : पाटण मतदारसंघातील शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज यांनी अभियांत्रिकी शिक्षणातून बांधकाम क्षेत्राशी संबधित केलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. तीन पिढ्या यशस्वी राजकारण करत असलेल्या देसाई घराण्याला यशराजच्या संशोधनातील यशाचे मोठे कौतुक आहे. 

यशराज शंभूराज देसाई यांनी पुणे येथील सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजमध्ये विशेष प्राविण्यासह अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. शिक्षण पुर्ण होताना त्यांनी सहकाऱ्यांसमवेत संशोधन केले. बांधकामाच्या मजबुतीसाठी कॉंक्रीटमध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकलऐवजी ऊस गाळपापासून तयार करण्यात येणाऱ्या मोलॉसिसवर (मळी) प्रक्रिया करुन त्याचा वापर केल्यास पाचपटीने कमी खर्च कमी होतो, तसेच बांधकामाची ताकत 44 टक्कयाने वाढून बांधकाम मजबूत होणार असल्याबाबतचे संशोधन आहे. या संशोधनाला विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामधील आंतरराष्ट्रीय जर्नलकडून (इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्टीफिक रिसर्च इन सायन्स, इंजिनिअरींग ऍन्ड टेक्‍नॉलॉजी) कडून मान्यता देण्यात आली आहे. 

सातारा जिल्हयाच्या राजकारणात पाटणच्या देसाई घराण्याचे नाव अभिमानाने घेतले जाते. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी मंत्री म्हणून राज्याला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांनी तालुक्‍यातील सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकारी चळवळीला चालना दिली. त्यांच्यानंतर अत्यंत अल्प वयात साखर कारखान्याची जबाबदारी अंगावर पडलेले आणि आता पाटण तालुक्‍याचे विद्यमान आमदार असणारे आमदार शंभूराज देसाई यांना आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. या तिन्ही नेत्यांनी आपल्या कतृत्वाने आपल्या तालुक्‍याचे नाव राज्यपातळीवर नेण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे.

या यशामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पणतू आणि शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज देसाई यांची भर पडली आहे. त्यांनी राजकारणाच्या पलिकडे जावून अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करताना प्रत्येक वर्षी विशेष प्राविण्य मिळवून पाटण तालुक्‍याला नावलौकीक मिळवून दिला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख