Satara Jalamandir Palace's Maids Marriage | Sarkarnama

गीता मावशीच्या मुलीच्या विवाहासाठी धावल्या राजमाता कल्पनाराजे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

गीता पांडुरंग माने उर्फ गीता मावशी या गेली बारा वर्षांपासून राजघराण्याकडे सेवक म्हणून कार्यरत आहेत. राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी गीता मावशी काम करतात. राजघराण्याची प्रामाणिक सेवा करणाऱ्यांमध्ये गाती मावशींचे नाव आवर्जून घेतले जाते. राजमाता कल्पनाराजे यांच्यासोबतच खासदार उदयनराजे यांचेही त्यांच्यावर तेवढेच लक्ष असते. प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्यांच्या पाठीशी छत्रपतींचे घराणे नेहमीच उभे राहिले आहे. तीच परंपरा आजही पुढे सुरू ठेवण्याचे काम सातारच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केले आहे. 

सातारा : प्रजाहित दक्षतेचाच नव्हे तर आपल्या राजघराण्याची सेवा करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या मदतीला धावण्याचा वारसा जपायचा असतो, हे छत्रपतींच्या काळापासून राजघराण्याने जपले आहे. आज हे सातारच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सिध्द केले. जलमंदीर पॅलेसमध्ये काम करणाऱ्या गीता मावशी यांच्या मुलीचा विवाहाचा सर्व खर्च स्वत: करून थाटामाटात लग्न करून दिले. 

गीता पांडुरंग माने उर्फ गीता मावशी या गेली बारा वर्षांपासून राजघराण्याकडे सेवक म्हणून कार्यरत आहेत. राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी गीता मावशी काम करतात. राजघराण्याची प्रामाणिक सेवा करणाऱ्यांमध्ये गाती मावशींचे नाव आवर्जून घेतले जाते. राजमाता कल्पनाराजे यांच्यासोबतच खासदार उदयनराजे यांचेही त्यांच्यावर तेवढेच लक्ष असते. प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्यांच्या पाठीशी छत्रपतींचे घराणे नेहमीच उभे राहिले आहे. तीच परंपरा आजही पुढे सुरू ठेवण्याचे काम सातारच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केले आहे. 

गीता मावशी यांची मुलगी पूजा हिचा विवाह कर्जत (नगर) येथील रामदास सुर्वे यांचे चिरंजीव निखिल याच्याशी आज झाला. या विवाहाचा सर्व खर्च सेविकेची मुलगी नव्हे तर स्वत:ची मुलगी मानून राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केला. सातारा नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात आज हा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी राजमाता कल्पनाराजे यांनी स्वत: उपस्थित राहून वधू-वरांना आशिर्वाद दिला. यावेळी जलमंदीर येथे काम करणारी सर्व सेवक मंडळी उपस्थित होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख