माणमध्ये जयकुमार गोरे की शेखर गोरे? युतीत जोरदार रस्सीखेच

गेल्या पाच वर्षात शेखर गोरेंनी मतदार संघ चांगलाच पिंजून काढला आहे.त्यामुळे जयकुमार गोरेच्या पुढे या वेळी शेखर गोरेचे तगडे आव्हान आहे. त्यातच भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांकडून जायकुमार गोरेंना कडाडून विरोध होत आहे. त्याच प्रमाणे या भागातील सर्व पक्षीय नेत्यांच्या वारंवार बैठका सुरू असून गोरेंच्या उमेदवारीच्या विरोधात एक उमेदवार देण्याची जय्यत तयारी सुरू आहे.
Shekhar Gore and Jaykumar Gore
Shekhar Gore and Jaykumar Gore

सातारा : जिल्ह्यातील माण या मतदार संघावर गेली दोन टर्म जयकुमार गोरे यांची एक हाती सत्ता होती असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही. एकदा अपक्ष आणि एकदा काँग्रेस कडून आमदार झालेले जयकुमार गोरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. परंतु, या विधानसभेच्या आधी जयकुमार गोरेंनी राजीनामा देऊन कमळ हातात घेतले. गोरे यांना निवडणूक सोपी जाणार असे बोलले जात असतानाच त्यांचेच बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून या मतदार संघावर शिवसेनेचा दावा केला आहे.

गेल्या पाच वर्षात शेखर गोरेंनी मतदार संघ चांगलाच पिंजून काढला आहे.त्यामुळे जयकुमार गोरेच्या पुढे या वेळी शेखर गोरेचे तगडे आव्हान आहे. त्यातच भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांकडून जायकुमार गोरेंना कडाडून विरोध होत आहे. त्याच प्रमाणे या भागातील सर्व पक्षीय नेत्यांच्या वारंवार बैठका सुरू असून गोरेंच्या उमेदवारीच्या विरोधात एक उमेदवार देण्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सगळ्या वादात माण मतदार संघाचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. शिवसेनेने हा मतदार संघ सोडण्यास जोरदार विरोध केल्याची सूत्रांची माहिती आहे.भाजप कडून मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव सुद्धा शिवसेनेला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 

पण आजून त्या बाबत शिवसेने कडून कोणताही निरोप नसल्याचे समजते. शेखर गोरेंनी गेल्या महिन्यात महिलांचा मोठा कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमा साठी २५ हजार महिला उपस्थित होत्या शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सुद्धा या वेळी उपस्थित होते या कार्यक्रमा नंतर शिवसेनेचा मतदार संघा बाबत आत्मविश्वास वाढला असल्याचे बोलले जात आहे.एकूणच काय तर या वेळी च्या निवडणुकीत जयकुमार गोरेंना त्यांच्या बंधूंचेच तगडे आव्हान असून तिकीट मिळवण्या पासून निवडून येईपर्यंत प्रत्येक ठिकाणी भाजप आणि जयकुमार गोरे यांची कसोटी लागणार हे मात्र नक्की

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com