'जनता कर्फ्यू' थांबवा! सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी खडसावले!

जनता कर्फ्यू घेण्याचा घेतलेला निर्णय किंवा त्यांचे अधिकार पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आहेत.
satara collector
satara collector

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांचे मुख्याधिकारी यांना जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊन करण्याचा अधिकार नाही. सध्या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, लोणंद, मेढा येथे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय योग्य नाही. या प्रकारामुळे जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याने हा जनता कर्फ्यू तातडीने थांबवावा, अशा शब्दांत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील पालिकांच्या सीईओंना खडसावले आहे.

कऱ्हाड, मेढा, कोरेगाव, लोणंद येथील नगरपंचायत आणि पलिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यू जाहिर केला आहे. त्यानुसार गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस त्याची अंमलबजावी करण्यात येत आहे. यावरून जिल्हाधिकरी शेखर सिंह यांनी पालिका व नगरपंचायतींच्या सीईओंना चांगलेच खडसावले आहे. त्यांनी म्हटले की, पालिकांचे मुख्याधिकारी व नगरपंचायती यांना जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊन करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे संबंधितांची हे सर्व तात्काळ थांबवावे. अशा निर्णयामुळे जिल्ह्यात संभ्रम निर्माण होत आहे. 144 कलमानुसार लागू केलेली जमावबंदीची आपण काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यापेक्षा काहीही करू नये. याची अंमलबजावणी करण्यात कोणी दूर्लक्ष करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. कोणत्याही कारणास्तव अत्यावश्‍यक सेवा बंद करता येत नाहीत. जनता कर्फ्यू घेण्याचा घेतलेला निर्णय किंवा त्यांचे अधिकार पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आहेत. यासंदर्भात कोणाला समजले नसेल तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. त्यासाठी मला मोबाईलवरून संपर्क करू शकता किंवा प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी, अशी सूचनाही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com