IAS श्‍वेता सिंघल ठरल्या 'आयकॉन इन्सपायरेशन वुमेन'  - satara collector shweta singhal awarded | Politics Marathi News - Sarkarnama

IAS श्‍वेता सिंघल ठरल्या 'आयकॉन इन्सपायरेशन वुमेन' 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 मे 2018

सातारा : नवभारत ग्रुपच्यावतीने दिला जाणारा "आयकॉनिक इन्सपायरेशनल वुमेन ऑफ नवभारत' या पुरस्काराने साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना नुकतेच मुंबईत गौरविण्यात आले. 

सातारा : नवभारत ग्रुपच्यावतीने दिला जाणारा "आयकॉनिक इन्सपायरेशनल वुमेन ऑफ नवभारत' या पुरस्काराने साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना नुकतेच मुंबईत गौरविण्यात आले. 

मुंबईतील हॉटेल ताज विवांता नवभारत ग्रुपतर्फे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत व उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचा समावेश आहे. या कार्यक्रमास महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, नवभारतच्या संचालिका अनुपमा माहेश्वरी, साई ग्रुपच्या संचालिका स्वाती वाधवानी आदी उपस्थित होते. महिला सनदी अधिकारी म्हणून श्‍वेता यांनी केलेल्या कामांची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख