इस्लामपूर, पुण्याकडून येणारी माणसं थांबवा : सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना - Satara Collector Shekhar Singh Orders Restrictions on Pune and Islampur Traffic | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

इस्लामपूर, पुण्याकडून येणारी माणसं थांबवा : सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत. जिल्ह्याबाहेरुन जिल्ह्यात येणारी आणि विशेषतः सांगली, इस्लामपूरसह पुण्याकडून येणारी लोकं तेथेच थांबवली पाहिजेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्या, अशा सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या

कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत. जिल्ह्याबाहेरुन जिल्ह्यात येणारी आणि विशेषतः सांगली, इस्लामपूरसह पुण्याकडून येणारी लोकं तेथेच थांबवली पाहिजेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्या, अशा सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिंग यांनी आज कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेवुन करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.  जिल्हाधिकारी सिंग यांनी तालुक्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा प्रांताधिकारी, पोलिस उपाधिक्षक, पालिकेचे मुख्याधिकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडून घेतला. त्यांनी शहरासह तालुक्यात करण्यात आलेल्या उपययोजनासंदर्भात समाधान व्यक्त केले. 

त्यानंतर त्यांनी कऱ्हाड जवळीलच इस्लामपूरमध्ये सापडलेल्या संशयितांच्या पार्श्वभूमीवर आणि पुण्यामधील सद्यस्थितीवरुन कऱ्हाडमध्ये व जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरुन येणारी विशेषतः सांगली, इस्लामपुरसह पुण्याकडून येणारी लोकं तेथेच थांबवली पाहिजेत, असे आवाहन अधिकाऱ्यांना करुन त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्या, अशा सुचना केल्या. त्याचबरोबर शासनाकडून देण्यात आलेल्या आदेशांची योग्य अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

'कृष्णा'तील विलगीकरण कक्षाची पाहणी

कृष्णा रुग्णालयात कोरोना संशयीत रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. तेथे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील सद्यस्थितीची पाहणी जिल्हाधिकारी सिंग यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी त्यांनी तेथील माहिती घेवुन राबवण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल समाधान व्यक्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख