राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे 

 राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे 
राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे 

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यातील पोलिस कवायत मैदानावरून शासकीय विश्रामग्रहाकडे जाताना वाटेत राष्ट्रवादी कार्यालयासमोर थांबलेल्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफीसाठी घोषणा देत त्यांना काळे झेंडे दाखवले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजता हेलिकॉप्टरने आगमन झाले. पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचा ताफा विश्रामगृहाकडे जात असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्‍कार असो, मेडिकल कॉलेज झालेच पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे अश्‍या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, जयश्री पाटील, सभापती मिलिंद कदम, सतीश चव्हाण, अतुल शिंदे, बाळासाहेब महामुलकर, राजकुमार पाटील, नितीन भोसले, आदी सहभागी होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com