कोरोना इफेक्ट : लॉकडाऊनमध्ये सातारच्या नगराध्यक्षा प्रभागात सक्रिय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या वतीने विविध प्रभागात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. या कामांची नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पाहणी केली. त्यांनी प्रभाग क्रमांक 18, 19 व 20 या तीन प्रभागांना भेट देऊन पालिका कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या वतीने विविध प्रभागात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. या कामांची नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पाहणी केली. त्यांनी प्रभाग क्रमांक 18, 19 व 20 या तीन प्रभागांना भेट देऊन पालिका कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या
Satara City President Madhavi Kadam inspected Disinfectant Spray Work
Satara City President Madhavi Kadam inspected Disinfectant Spray Work

सातारा :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या वतीने विविध प्रभागात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. या  कामांची नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पाहणी केली. त्यांनी प्रभाग क्रमांक 18, 19 व 20 या तीन प्रभागांना भेट देऊन पालिका कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

कोरोनाला प्रादुर्भाव होऊ नये याकरता पालिका उपाययोजना करतआहे. त्याची पाहणी करण्यासाठी प्रभाग क्र. १८, १९ व २० मध्ये नगराध्यक्षा माधवी कदम, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी केली. प्रभागामध्ये स्वच्छतेची पाहणी केली तसेच नागरीकांनी घरामध्येच थांबावे, विनाकारण घराबाहेर  फिरु नये. भाजीपाला, किराणा व फळे, दुध तुम्हाला घराजवळ मिळेल असे नियोजन केले आहे, अशी माहिती त्यांनी नागरिकांना दिली. या वेळी नगरसेविका सोनाली नलवडे, सुनिता पवार व लिना गोरे उपस्थित होत्या.

पालिकेच्या वतीने आवाहन

लॉक डाऊनच्या काळात जे परराज्यातील कामगार सातारा शहरात आहेत. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांची उपासमार होऊ नयेयाकरता शहरातील स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी यांनी यथाशक्ती मदत करावी, पालिकेकडे धान्य व साहित्य जमा करावे, जेणेकरून त्या नागरिकांना देता येईल, असे आवाहन उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com