शेतकऱ्यांची फसवणुक, महिलावंरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी एल्गार आंदोलन

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. सरकारच्या बेफीरीमुळे राज्यात महिलावरील अत्याचार वाढले आहेत, असा आरोप करतत्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 25) आंदोलन करण्यात येणार आहे
BJP Agitations against Government on Monday
BJP Agitations against Government on Monday

कऱ्हाड : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. सरकारच्या बेफीरीमुळे राज्यात महिलावरील अत्याचार वाढले आहेत, असा आरोप करत त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 25) जिल्हाधिकारी कार्यालय, कऱ्हाड, कोरेगाव, खंडाळे येथील तहसील कार्यालय, वाई येथे पोलिस ठाण्यासमोर तर महाबळेश्वर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे चिटणीस अतुल भोसले व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, "भाजपचा विश्वासघात करुन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करताना सेना प्रमुख व सध्याचे मुख्यमंत्री, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन अवकाळीग्रस्तांना हेक्टरी 25 हजार आणि फळबागांसाठी 50 हजार मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आश्वासनांचा विसर पडला आहे. नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही.''

''महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची फसवणुक करणारी आहे. सरकारने फक्त अल्पमुदतीची पीककर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही. सरकारने तुर खरेदीचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांकडुन होणाऱ्या खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपतर्फे आम्ही निषेध करत आहोत. महिनाभरात महिलांवरील आत्याचार वाढले आहेत. महिलांवर आत्याचार करणाऱ्यांवर धाक बसवण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात व्यग्र आहेत.'' असा आरोपही त्यांनी केला.

''हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. हिंगणघाड येथील प्रकरण, अॅसीडहल्ला, अल्पवयीन मुलींवर आत्याचार, बलात्कार, महिलांना जाळुन टाकणे अशा घटना वाढु लागल्या आहेत. त्यामुळे तरुणी, महिलांत भितीचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या निधेधार्थ मंगळवारी भाजपच्यावतीने धरणे आमदोलन करण्यात येणार आहे,'' अशी माहिती देऊन श्री. भोसले व श्री. पावसकर यांनी सर्वानी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी मुकुंद चरेगावकर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रमोद शिंदे, कऱ्हाड दक्षिणचे धनाजी पाटील, संजय पवार, महिला मोर्चाच्या डाॅ. शुभांगी गावडे, प्रशांत कुलकर्णी, सीमा घार्गे, स्वाती पिसाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com