`आघाडी सरकारने पहिला दगड सरपंचांच्या डोक्यात घातला'

राज्य शासनाने जनतेतून सरपंच निवड रद्द केल्याच्या निषेधार्थ शेवगाव येथे आज महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्यावतीने आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. या मोर्चाचे नेतृत्व राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केले. तहसिल कार्यालयावर आलेल्या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
sarpanch unhappy over thackeray governments decision
sarpanch unhappy over thackeray governments decision

शेवगाव  : राज्य शासनाने जनतेतून सरपंच निवड रद्द केल्याच्या निषेधार्थ शेवगाव येथे आज महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्यावतीने आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. या मोर्चाचे नेतृत्व राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केले. तहसिल कार्यालयावर आलेल्या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. 

या मोर्चामध्ये प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, शेवगावचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब गोरडे, उपाध्यक्ष गोकुळ भागवत, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष धनंजय बड आदींसह शेवगाव, पाथर्डी व पैठण येथील सरपंच या मोर्चामध्ये निषेधाच्या घोषणांचे फलक घेवून सहभागी झाले होते.

सरपंच जनतेतूनच हवा
या वेळी झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे म्हणाले की, सरपंच ग्राम विकासाचा पाया आहे. काम करणारा सरपंच लोकांतून निवडण्याचा दिलेला अधिकार योग्य आहे. मात्र लोकांना हा निर्णय मान्य असताना हे सरकारने हा निर्णय रद्द करण्याच्या तयारीत आहे. त्यांचा हा निर्णय सरपंचाच्या कामाला एक प्रकारे लगाम घालण्याचा प्रकार आहे. सरकारने या निर्णयाचा अजूनही फेरविचार करून सरपंच निवड थेट जनतेतून ठेवावी. निर्णय जर रद्द केला, तर सरपंच परिषद राज्यभर तीव्र आंदोलन करेल.

गीते म्हणाले की, त्यांनी डोक्यातच दगड घातला
महाआघाडी सरकारने पहिले काम कोणते केले असेल, तर ते सरपंचांच्या डोक्यात दगड घालण्याचे काम केले. सरपंचाची निवड ही जनतेतूनच व्हायला हवी. आम्ही राजकारण करत नाहीत. पण सरकारला नवे नेतृत्व तयार होऊ दयायचे नाही. सरकार जर आमच्यासोबत जाणीवपूर्वक हिनतेने वागत असेल, तर आपापल्या गावात त्यांना योग्य जागा दाखवून देऊ. आम्ही पुन्हा सरकारमधील लोकांना भेटणार असून, विनंती करणार आहोत. मात्र तरीही सरकार निर्णयावर ठाम राहिले, तर प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मोर्चे काढू.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com