युवा सरपंच देवीदास देवगिरेंनी शेतीतला भाजीपाला स्वखर्चाने वाटला शहरवासीयांना

भाजीपाल्याला भाव नाही, शेतात जनावरे सोडा. या बातम्या नेहेमीच्या आहेत. मात्र भाव नाही म्हणून ते पीक नष्ट न करता एकाचेच नव्हे तर सबंध गावातील भाजीपाला एकत्र करुन, स्वखर्चाने शहरात नेऊन गरजुंमध्ये त्याचे वाटप करण्याचा एक सकारात्मक, प्रेरणादायी प्रयोग एका युवा सरपंचाने केला आहे
Nashik Sarpanch Distributed Vegetables in City for Free
Nashik Sarpanch Distributed Vegetables in City for Free

नाशिक : भाजीपाल्याला भाव नाही, शेतात जनावरे सोडा. या बातम्या नेहेमीच्या आहेत. मात्र भाव नाही म्हणून ते पीक नष्ट न करता एकाचेच नव्हे तर सबंध गावातील भाजीपाला एकत्र करुन, स्वखर्चाने शहरात नेऊन गरजुंमध्ये त्याचे वाटप करण्याचा एक सकारात्मक, प्रेरणादायी प्रयोग एका युवा सरपंचाने केला आहे. त्याच्या या प्रयोगाने दोन हजार घरांतील ताटात ताजी अन्‌ ती देखील मोफत भाजी पोहोचली आहे. 'कोरोना'ने निर्माण झालेल्या स्थितीमुळे हे घडले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्‍यातील पिपंळगाव (घाडगा)चे सरपंच देवीदास देवगिरे, कॉंग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष रमेश देवगिरे, ग्रामपंचायत सदस्य महाराज जोशी, पोलिस पाटील प्रकाश घाडगे यांनी शनिवारी सायंकाळी शहरातील जेल रोड भागात नगरसेवक प्रशांत दिवे यांच्यासमवेत नागरीकांनाहा भाजीपाला वाटप केला.

व्यापारी घेत आहेत गैरफायदा

सध्या कोरोना मुळे सगळीकडे संचारबंदी आहे. बाजार समिती बंद आहे. त्याचा फायदा घेऊन अनेक किरकोळ विक्रेते भाजीपाला व जीवनाश्‍यक वस्तू महागात विक्री करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसतो. त्यांच्या कोबी, फ्लॉवरला देखील भाव मिळेना, त्यावर काहींनी पिकात जनावरे घालावीत, असे मत मांडले. मात्र त्यात नुकसानच होते. त्यामुळे त्यांनी स्वतःचा व गावातील ज्यांचा ज्यांचा शक्‍य होते तो भाजीपाला एकत्र केला. स्वखर्चाने तो नाशिकरोडला नेला. तेथे अगदी ताजा भाजीपाला नागरीकांना मोफत वाटला. भाजीपाला घेणाऱ्यांना त्यांच्या प्रयोगाची माहिती मिळाल्यावर त्यांनीही त्यांचे अभिनंदन, कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

सरपंच देवीदास देवगिरे यांची दहा एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस, कोबी, कांदा, मका ही पीके आहेत. करोनाच्या महासंकटाला तोंड देण्यासाठी विविध व्यक्ती, संस्था समाजाला मदत करत आहेत. आपनही योगदान द्यावे अशी त्यांची इच्छा होती. ती त्यांनी ग्रामपंचायत सदस्य महाराज जोशी, रमेश देवगिरे, पोलिस पाटील प्रकाश घाडगे यांच्याकडे बोलून दाखवली. प्रकाश घाडगे हे उपनगरला राहतात. त्यांची इच्छामणी गणेश मंदिराजवळ दूध डेअरी आहे. त्या परिसरात भाजीपाला वाटपाचे ठरले. 

सरपंच देवगिरे यांनी आपल्या पीकअप व्हॅनमध्ये कोबी व अन्य भाजीपाला भरुन स्वखर्चाने आणला व त्याचे मोफत वाटप केले. याआधी त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात धान्य व सॅनिटायझरचे वाटप केले. आता साबण व अन्य जीवनावश्‍यक वस्तू वाटप करणार आहेत. सहा महिन्यापूर्वी देवगिरे यांचे पॅनल सत्तेवर आले. सत्तेवर येताच त्यांनी गावात दारुबंदी देखील केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com