नवरा-बायको दोघेही सरपंच : दोन्ही पदांचे मानधन पूरग्रस्तांसाठी - sarpanch couple donates remuneration to cm fund | Politics Marathi News - Sarkarnama

नवरा-बायको दोघेही सरपंच : दोन्ही पदांचे मानधन पूरग्रस्तांसाठी

जनार्दन दांडगे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पुणे : सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना थेट आर्थिक मदत म्हणून पुणे जिल्ह्यातील एका सरपंच दांपत्याने आपले सन २०१६ पासूनचे दोघांचे एकत्रित रु.१ लाख ११ हजार एवढे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतेच मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द केले.

पुणे : सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना थेट आर्थिक मदत म्हणून पुणे जिल्ह्यातील एका सरपंच दांपत्याने आपले सन २०१६ पासूनचे दोघांचे एकत्रित रु.१ लाख ११ हजार एवढे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतेच मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द केले.

खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथील सरपंच प्रियंका मेदनकर व हवेली तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुदर्शन चौधरी या दांपत्याने आपले मानधन पुण्याचे प्रभारी पालकमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. 
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मध्यस्थिने जुळलेले विवाहबंधन म्हणजे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी व भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव प्रियंका मेदनकर यांचा. विशेष म्हणजे हे दोघेही नवराबायको जिल्ह्यातील अनुक्रमे सोरतापवाडी व मेदनकरवाडी या गावचे विद्यमान सरपंच आहेत. दोघेही विधायक उपक्रमात कायमच पुढे असतात. सुदर्शन चौधरी यांचे निर्मलवारीचे दरम्यान मोठे काम आहे.

दोघांनीही सरपंच झाल्यानंतर आपले मानधन अद्याप स्वत:साठी वापरले नव्हते. साधारण एप्रिल २०१६ च्या दरम्यान दोघेही सरपंचपदी आरुढ झाल्यानंतर तेंव्हा पासूनचे मानधन अनुक्रमे ६१ हजार व ५० हजार एवढे संकलीत झाल्याने हे संपूर्ण मानधन सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय दोघांनीही घेतला.
सोरतापवाडीला येण्याची ग्वाही!
या दांपत्याचा विवाह तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी जुळविल्याची माहिती यावेळी भेगडे यांनी मुख्यमंत्र्यांना देताच, ’बापटांनीही असाही पक्षवाढीचा उद्योग केलाय का? असे म्हणत सुदर्शन चौधरी यांची पाठ थोपटली तर स्वच्छता अभियान अंतर्गत सोरतापवाडीच्या कामाची चौकशी करुन तुमच्या सोरतापवाडीला मी येतोय असे म्हणून प्रियंका चौधरी यांना जेवण तयार ठेवा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख