सरोज पांडेंनी घेतली भाजप नेत्यांची हजेरी, म्हणाल्या....गैरहजर पदाधिकाऱ्यांना घरी पाठवा

सरोज पांडे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस असताना, त्यांच्या उपस्थितल्यापदाधिकाऱ्यांच्या बैठकीला महत्त्व दिले नसल्याचे सोमवारी दिसले. सकाळी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात बैठक होणार होती. सरोज पांडे बैठकीला हजर झाल्या तरी पदाधिकारी मात्र दिसत नव्हते. पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन पांडे यांनी हजेरी घेतली असता, बहुसंख्य पदाधिकारी गैरहजर आढळले.
 सरोज पांडेंनी घेतली भाजप नेत्यांची हजेरी, म्हणाल्या....गैरहजर पदाधिकाऱ्यांना घरी पाठवा

नाशिक : भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांच्या उपस्थितीत काल विधानसभा निवडणूक आढावा बैठक झाली. यावेळी बहुसंख्या पदाधिकाऱ्यांनीच बैठकीकडे पाठ फिरवली. अत्यल्प हजेरी पाहून संशय आल्याने त्यांनी उपस्थितांची हजेरी घेतली बहुसंख्य पदाधिकारीच गैरजहर असल्याने त्या नेत्यांवर चागंल्याच संतापल्या. ''गैरहजर पदाधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन कारण विचारा. बैठकीला न आलेल्यांना पदमुक्त करा. या पत्राची प्रत मला पाठवा,'' अशी सुचनाच त्यांनी शहराध्यक्षांना केली. 

सरोज पांडे पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस असताना, त्यांच्या उपस्थितल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला महत्त्व दिले नसल्याचे सोमवारी दिसले. सकाळी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात बैठक होणार होती. सरोज पांडे बैठकीला हजर झाल्या तरी पदाधिकारी मात्र दिसत नव्हते. पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन पांडे यांनी हजेरी घेतली असता, बहुसंख्य पदाधिकारी गैरहजर आढळले. सोळा उपाध्यक्षांपैकी सहा, सोळा सरचिटणीसांपैकी सहा आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांत केवळ नऊ नेते उपस्थित आढळले. निवडणुकीच्या आढावा बैठकीलाच पदाधिकारी गैरहजर रहात असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या सगळ्यांना लिखीत स्वरुपात विचारणा करा. त्याची प्रत मला पाठवा. बेजबाबदार लोकांना पदमुक्त करा अशा सुचना त्यांनी दिल्या. मात्र, हजेरीचा निरोप गेल्यानंतर काही पदाधिकारी धावपळ करीत पोहोचले. बैठक संपताना गर्दी दिसली. दरम्यान, सदस्य नोंदणी कामात पदाधिकारी व्यग्र असल्याने बैठकीला विलंब झाल्याचा दावा आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केला. 

बैठकीत बोलताना श्रीमती पांडे म्हणाल्या, ''सत्तर वर्षे सातत्याने लढा दिल्यानंतर भाजपला आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता प्राप्त झाली आहे. सत्तेमागचे यश समजावून घेऊन कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. राज्यात विरोधी पक्ष कमकुवत झाला आहे. त्याचा फायदा निवडणुकीत घ्यावा. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश कार्यकर्त्यांमुळे आहे, त्यामुळे विधानसभा जिंकण्यासाठी तेवढेच प्रयत्न गरजेचे आहेत.'' नाशिक शहरात तीन, तर ग्रामीण भागातून एक, असे चार आमदार निवडून आले आहेत. चार जागा कायम राखताना अधिक आमदार निवडून आणावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

यावेळी नवमतदार नोंदणी व सदस्य नोंदणी अभियानाच्या जनजागृती रथाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, पक्षाचे सरचिटणीस प्रशांत जाधव, सदस्य नोंदणी मोहिमेचे उत्तर महाराष्ट्र संयोजक शशिकांत वाणी, उत्तम उगले, प्रदीप पेशकार आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com