saroj pande and nagar | Sarkarnama

गैरहजर पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे सरोज पांडे यांच्याकडून संकेत

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 जुलै 2019

नगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाचा संघटन पातळीवर राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी खासदार सरोज पांडे यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली. परंतु बैठकीला दोन आमदार, महिला पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी दांडी मारली. त्या दांडी बहाद्दरांवर कारवाई होणार असल्याचे संकेत पांडे यांनी दिले. 

नगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाचा संघटन पातळीवर राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी खासदार सरोज पांडे यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली. परंतु बैठकीला दोन आमदार, महिला पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी दांडी मारली. त्या दांडी बहाद्दरांवर कारवाई होणार असल्याचे संकेत पांडे यांनी दिले. 

नगर जिल्ह्यातील आढावा बैठकीपासून खासदार सरोज पांडे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा सुरू केला. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी खासदार दिलीप गांधी, अभय आगरकर, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी उपस्थित होते. 

पांडे म्हणाल्या, ""महाराष्ट्रात युती होणार अथवा नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडा. जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्यासाठी ताकद लावा. निवडणुकीसाठी निश्‍चित केलेली रणनीती खालपर्यंत उतरविण्यासाठी सर्वांनी काम करायला हवे. दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांना बळजबरी आणले जात नाही. विरोधी पक्षाच्या कमजोरीचा फायदा भाजपने उठविला. त्यातील चांगल्या लोकांना पक्षात घेतले. भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. यात 11 कोटी सदस्य आहेत. भाजप हा कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष आहे."" 

कर्डिले, राजळे गैरहजर 
दरम्यान, बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे गैरहजर होते. जिल्हा ग्रामीणचे पाच उपाध्यक्ष, तीन सचिव, महिला मोर्चा अध्यक्ष, शहर जिल्हा पाच उपाध्यक्ष व दोन सहसचिव गैरहजर हे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पांडे यांनी दिल्या. रक्षाबंधनच्या दिवशी मंडलनिहाय स्त्री शक्‍ती अभियान राबविण्याबाबत सूचना दिल्या. 

कॉंग्रेसचा मेकअप बदलला 
सरकारने अनेक चांगल्या योजना राबविलेल्या आहेत. या योजना घेऊन पक्ष कार्यकर्त्यांनी जनतेसमोर जायला हवे. मी भाजपमध्ये नवीन आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यापासून भाजप नेत्यांशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. सध्या कॉंग्रेसचा चेहरा तोच ठेऊन मेकअप बदलण्यात आला असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख