पुण्याची निवडणूक भाजप म्हणते सोपी....तर काॅंग्रेस म्हणते 23 मे रोजी आमचाच गुलाल उधळेल..

पुण्याची निवडणूक भाजप म्हणते सोपी....तर काॅंग्रेस म्हणते 23 मे रोजी आमचाच गुलाल उधळेल..

पुणे : गेल्या पाच वर्षात केलेली पाच कामे तरी भारतीय जनता पक्षाने दाखवावीत असे आव्हान कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज केले तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कागदावर ठेवलेली मेट्रो केवळ भाजपामुळेच प्रत्यक्षात आल्याचा दावा भाजपाचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट यांचे प्रचारप्रमुख आमदार विजय काळे यांनी केला. 

"सरकारनामा फेसबूक लाईव्ह'च्या माध्यमातून आयोजित चर्चेत बागवे व काळे बोलत होते. बागवे म्हणाले, " गेल्या पाच वर्षात कोणतेही ठोस काम भाजपाकडून झालेले नाही. स्मार्ट सिटीचे उदघाटन मोठ्या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काहीच झालेले नाही.केवळ फसव्या घोषणा व खोटी उद्‌घाटने या पलिकडे काहीच झालेले नाही. महापालिकेत संपूर्ण सत्ता, आठ आमदार व खासदार असतानादेखील भाजपाने पुणेकरांची फसवणूक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा विजय निश्‍चित आहे.'' 

आमदार काळे म्हणाले, " पुण्यातील निवडणूक आमच्यासाठी अत्यंत सोपी आहे. गेल्यावेळीपेक्षा अधिक मतांनी आमचे उमेदवार गिरीश बापट निवडून येणार आहेत. प्रचाराची संपूर्ण फेरी पूर्ण झाली आहे. बूथ पातळीवर पक्षाचे निवयोजन पक्के आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नियोजनबद्धपणे काम सुरू आहे. त्यामुळे आमचा विजय निश्‍चित आहे.'' 

या निवडणुकीत एकाही मोठ्या नेत्याची सभा पुण्यात होत नसल्याबाबत विचारले असता आमदार काळे म्हणाले, "आमचा पुण्यातील उमेदवार निवडून आल्यात जमा आहे. ज्याठिकाणी आवश्‍यकता असे त्या ठिकाणी पक्षातील वरिष्ठ नियोजन करून सभा ठरवत असतात. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आहे. अन्य काही नेते शेवटच्या टप्प्यात होणार आहेत.''

बागवे म्हणाले, "पृथ्वीराज चव्हाण पुण्यात ठाण मांडून आहेत. अन्य नेत्यांच्या सभा शेवटच्या टप्प्यात होणार आहेत. आमच्या उमेदवाराला चांगले वातावरण असून मोहन जोशी चांगल्या मतांनी निवडून येतील यात शंका नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com