sarkarnama exclusive udyanraje join bjp on 14 september | Sarkarnama

उदयनराजे 14 ला दिल्लीत, 15 ला महाजनादेशयात्रेत!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

आज सकाळी उदयनराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

पुणे: खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशासंबंधी गेले तीन दिवस वेगवान घडामोडी सुरू आहेत. आज सकाळी उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर बराच विचार करून त्यांनी भाजपप्रवेश निश्चित केला.

गेले महिनाभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवेशासंबंधाने उदयनराजेंच्या संपर्कात आहेत. दोन दिवसांपुर्वी वर्षा बंगल्यावर त्यांची चर्चा झाली, मात्र अंतिम निर्णय झाला नव्हता. आज सकाळी उदयनराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते.

या भेटीनंतर परतलेल्या उदयनराजेंनी सुमारे 5 तास विचार केला. त्यानंतर भाजपच्या संपर्कयंत्रणेला होकार दिला. त्यानुसार 14 सप्टेंबरला दिल्लीत भाजपप्रवेश होईल. 15 सप्टेंबरला ते साताऱ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होतील.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख