sarkarnama exclusive पृथ्वीराज-बांधकाम, अशोक चव्हाण-ऊर्जा : संभाव्य मंत्रीमंडळ तयार

अजित पवार यांचा डिसेंबर अखेर होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळणार नसल्याची चर्चा आहे.
ashok chavan-prithviraj chavan
ashok chavan-prithviraj chavan

मुंबई ः राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार 23 डिसेंबरनंतर होणार असल्याने त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितिन राउत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर कोणत्या पक्षांकडे कोणते विभाग असतील याचे वाटप काल गुरूवारी करण्यात आले.

सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्रयांसह सात मंत्री आहेत आणि येत्या 16 डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सहा मंत्रयांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून अधिवेशनानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी मंत्रीमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्रयांकडे कोणते खाते असेल याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. यात तिन्ही पक्षातीन जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्रयांचा समावेश असेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

काही मंत्रीपदे रिक्‍त राहणार
तिन्ही पक्षांतील नाराजांना गाजर दाखविण्यासाठी किमान दोन वर्षे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात काही मंत्रीपदे रिक्‍त ठवेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रीपदरे रिक्‍त ठेवण्यात येतील. तर कॉंग्रेसच्या कोटयात एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्रीपदे रिक्‍त ठेवण्यात येणार आहे. हि पदे दोन ते अडीच वर्षांनतर होणा-या मंत्रीमंडळ विस्तारात भरण्यात येणार असल्याचे समजते.

विस्तार आणि संभाव्य खातेवाटप
शिवसेना - 12 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री - एकूण 16
ः- उद्धव ठाकरे - गृह, सामान्य प्रशासन, विधी व न्याय
ः- एकनाथ शिंदे - नगरविकास, संसदीय कार्य,सार्वजनिक बांधकाम - सार्वजनिक उपक्रम
ः- सुभाष देसाई - उद्योग व खनीकर्म
ः- सुनील प्रभू - वने व पर्यावरण
ः-आशिष जैसवाल - पाणीपुरवठा व स्वच्छता
ः- तानाजी सावंत - जलसंधारण, रोजगार हमी
ः- दिपक केसरकर - पर्यटन, मराठी भाषा
ः- रविंद्र वायकर - उच्च व तंत्र शिक्षण
ः- अनिल बाबर - कृषी व फलोत्पादन
ः- गुलाबराव पाटील -परिवहन, माजी सैनिक कल्याण, क्रिडा व युवक कल्याण
....................
राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॅबिनेट 11 आणि 4 राज्यमंत्री- एकूण 15
ः- जयंत पाटील - वित्त व नियोजन
ः- अनिल देशमुख - अन्न व नगीा पुरवठा
ः- हसन मुश्रीफ - सहकार व पणन
ः- छगन भुजबळ - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
ः- नवाब मलिक - गृहनिर्माण, कामगार व अल्पसंख्यांक विकास
ः- डॉ. राजेंद्र शिंगणे - सार्वजनिक आरोग्य
ः- जितेंद्र आव्हाड - सामाजिक न्याय
ः- राजेश टोपे - राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास
ः- ग्रामविकास - मकरंद पाटील
..........................
कॉंग्रेस - कॅबिनेट 8 आणि 4 राज्यमंत्री - एकूण 12
ः- बाळासाहेब थोरात - महसूल, मदत व पुनर्वसन
ः- पृथ्वीराज चव्हाण - सार्वजनिक बांधकाम
ः- अशोक चव्हाण - उर्जा, अपारंपारीक उर्जा
ः- विजय वडेटीवार - आदिवासी विकास, वस्त्रोद्योग
ः- सतेज पाटील - शालेय शिक्षण व वैद्यकीय शिक्षण
ः- डॉ. नितिन राउत - पशुसंवर्धन व दुग्धविकास
ः- वर्षा गायकवाड - महिला व बालविकास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com