SARKARNAMA EXCLUSIVE : पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला गिरीश महाजनही जाणार - sarkarnama exclusive : girish mahajan to participate in Pankaja Munde Rally | Politics Marathi News - Sarkarnama

SARKARNAMA EXCLUSIVE : पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला गिरीश महाजनही जाणार

कैलास शिंदे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पंकजा मुंडे यांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचे दाखविण्याचा नेत्यांचा प्रयत्न

जळगाव : ``माझ्या रक्तात बंडखोरी नाही, असे पंकजा मुंडेनी जाहिर केले आहे. मी पण त्यांच्यशी बोललेलो आहे. त्यामुळे त्यांचा पक्षातंराचा कोणताही विषय नाही. त्याबाबतचा विषयच आता संपला आहे. मी सुद्धा बारा डिसेंबरला गोपीनाथगडावर जाणार आहे, अशी माहिती राज्याचे माजी जलसंपदामंत्री व भाजपचे "संकटमोचक'गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'शी बोलतांना दिली.

भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षात अस्वस्थ असून त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. पक्षाचे "संकटमोचक'म्हणून गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते,म्हणाले, पंकजा मुंडे यांच्यशी आपण संपर्क केला आहे. त्यांनी पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले आहे. या शिवाय आपल्या रक्‍तात बंडखोरी नाही असे त्यांनी जाहिरपणे सांगितले, त्यामुळे त्या पक्षातंर करणार नाहीत, हे आपण खात्रीने सांगू शकतो, त्यामुळे त्यांच्या पक्षांतराबाबतचा विषय आता संपला आहे. बारा डिसेंबरला गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याबाबत ते म्हणाले, त्या दिवशी मी सुद्धा गोपीनाथ गडवर निश्‍चित जाईन.``

तीन पक्षांच्या सरकारवर लक्ष
आता विरोधी पक्ष म्हणून काम करण्याबाबत ते,म्हणाले, गेली पाच वर्षे सोडली तर आम्ही आजपर्यंत विरोधी पक्षातच होतो. त्यामुळे आताही आम्ही विरोधी पक्षाचे काम करणार आहोत. तीन पक्षाचे सरकार कसे चालते?यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत.

15 हजार कोटींना मंजूरी द्यांवी
राज्यातील तसेच खानदेशातील प्रलंबीत सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटीच कर्ज घेण्याचा ठराव केला आहे.त्याच निधीच्या आधारावर खानदेशातील मेगा रिचार्च, गिरणावरील बलून बंधारे.निम्म तापी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. नवीन सरकारने आता या निधीला मंजूरी द्यावी.अन्यथा मार्गी असलेले हे सिचंनाचे प्रकल्पही बंद पडून सिचंनाची मोठी तूट निर्माण होईल. नवीन सरकारच्या माध्यमातून हे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आपण विरोधी पक्ष म्हणून पाठपुरावा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख