सरकारनामा EXCLUSIVE : खासदार गायकवाडांचा पत्ता कट; सुधाकर श्रृंगारे लातूरमध्ये भाजपचे उमेदवार

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली असून त्यातील संभाव्य नावांची माहिती `सरकारनामा`ला विविध सूत्रांकडून मिळाली आहे. त्यातील लातूर मतदारसंघात श्रृंगारे यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी पसंती दिल्याचे समजते.
सरकारनामा EXCLUSIVE : खासदार गायकवाडांचा पत्ता कट; सुधाकर श्रृंगारे लातूरमध्ये भाजपचे उमेदवार

पुणे : भाजपचे लातूरमधील विद्यमान खासदार डाॅ. सुनील गायकवाड यांचा पत्ता कट होऊन त्यांच्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे समजते. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.

शृंगारे हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. गायकवाड यांच्याऐवजी शृंगारे यांच्या नावाचा आग्रह पालकमंत्र्यांनी धरल्याने अखेर त्यांनाच उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील नावांवर विचार करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटिवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रभारी सरोज पांडे, संघटनमंत्री विजय पुराणिक आदी उपस्थित होते.  

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी खासदार गायकवाड आणि शृंगारे यांच्या नावावर चर्चा झाली. त्यात शृंगारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शृंगारे हे वडवळ-नागनाथ गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले आहेत. जिल्हा नियोजन समितीचे ते सदस्य आहेत.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com