Sarkaranama politics Dhananjay Mahadik | Sarkarnama

महाडिकांचे आऊट गोइंग केव्हा? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 मार्च 2017

महाडिकांचे आऊट गोइंग केव्हा? 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे भाजपच्या प्रचारात गेले असल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे. ""महाडिक यांच्या विजयासाठी दोन्ही कॉंग्रेसच्या 

महाडिकांचे आऊट गोइंग केव्हा? 
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे भाजपच्या प्रचारात गेले असल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे. ""महाडिक यांच्या विजयासाठी दोन्ही कॉंग्रेसच्या 
कार्यकर्त्यांनी हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी केले. त्यानंतर झालेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत ते पक्षासोबत नव्हते. आम्ही डोळेझाक केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांच्याकडून तोच अनुभव आला. भविष्यात लोकसभेचे ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर कार्यकर्ते ते मान्य करतील काय,'' अशी भूमिका मुश्रीफ यांनी मांडली आहे. मुश्रीफजी काळजी करूच नका. महाडिकांचे राष्ट्रवादीतून "आऊट गोइंग' होईल. त्यासाठी ते पुढील लोकसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, हे कोल्हापुरातील नाक्‍यावरच्या पोरालाही माहीत आहे. 

भाजपमध्ये आता लग्नाची वरात 
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची लगिनघाई संपल्यानंतर भाजप नेत्यांच्या घरी खरेच लग्नाची गडबड सुरू झाली आहे. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आमदार आकाश यांचे एक मार्च रोजी लग्न आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे हे दोन मार्च रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कन्येचा विवाह सहा मार्चला आहे. एकूणच पुढचे सहा दिवस भाजप नेत्यांना बरेच बिझी राहावे लागणार आहे. 

मंत्री राजकुमार बडोलेंना बनविले "प्रिन्स' 
सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांना एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने पाठविलेल्या पत्रात प्रिन्स बडोले असा नामोल्लेख केल्याने सामाजिक न्याय विभागात त्याची चर्चा रंगली आहे.. हैद्राबादमध्ये इंडो ग्लोबल कौशल्य विकास परीषद होणार आहे. या परिषदेचे निमंत्रण भारत सरकारचे सचिव सी. डी. अराह यांनी पाठविले आहे. मंत्र्यांना निमंत्रण देताना राजकुमार बडोले ऐवजी प्रिन्स बडोले असा उल्लेख पत्रात केला आहे. राजकुमार हे लाडाचे नाव वाटून त्याचे भाषांतर "प्रिन्स' म्हणून या अधिकाऱ्याने केले आहे. 

उदयनराजेंच्या धमकींवर परिचारकांचे नो कॉमेंटस 
लष्कराच्या जवानांबद्दल अवमानकारक उद्‌गार काढल्याने भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रशांत परिचारक वादात सापडले. त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. त्यांनी माफीही मागितली. झेडपी आणि पालिका निवडणुकीनंतर हे प्रकरण शांत होईल असे वाटत असतानाच साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी या वादात उडी घेतली. "असे उद्‌गार काढणाऱ्यांना ठोकणार म्हणजे ठोकणारच,' असे आता राजेंनी जाहीर केले आहे. यावर परिचारकांनी सध्या तरी नो कॉमेंटसची भूमिका घेत हे प्रकरण शांत करण्यावर भर दिल्याचे दिसते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख