saoner-mla-sunil-kedar-viral-poster | Sarkarnama

आमदार सुनील केदार यांच्या पोस्टरची विटंबना

अशोक डहाके
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या पोस्टरची विटंबना करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. यानंतर संतापलेल्या आमदार केदार यांच्या कार्यकर्त्यांनी केळवद पोलिसात तक्रार केली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. 

केळवद (ता. सावनेर) : सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या पोस्टरची विटंबना करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. यानंतर संतापलेल्या आमदार केदार यांच्या कार्यकर्त्यांनी केळवद पोलिसात तक्रार केली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. 

सावनेर-कळमेश्‍वर मतदार संघात केदार यांचे विटंबना केलेले बॅनर व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. 

सावनेर तालुक्‍यातील केळवद ग्रामपंचायतीच्या नळ योजनेकरीता नजीकच्या खैरी (ढालगाव) ते केळवद नव्या जलवाहिनीसाठी आमदार सुनील केदार यांनी 97 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. यासाठी आमदारांचे आभार मानत तालुका कॉंग्रेस कमेटीच अध्यक्ष सतीश लेकुरवाळे, पंचायत समिती सदस्य मोहन वानखेडे, माजी उपसरपंच नंदु ढोबळे यांनी केळवद बसस्थानक परिसरात शुभेच्छा बॅनर लावले. याच बॅनरमधील मजकूर तसाच ठेवत नावावर खोडतोड करण्यात आली. तर बॅनरमधील आमदार सुनील केदार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या छायाचित्रांचे फोटोशॉपच्या सहाय्याने वन्य प्राण्यांचे चेहरे लाऊन फोटो व्हॉट्‌सऍपसह सोशल मीडियावर वायरल करण्यात आले. 

यामुळे दुखावलेल्या आणि सतंप्त झालेल्या शेकडो कॉग्रेस कार्यकत्यांनी सतीश लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात ठाणेदार खोकले यांना तक्रार दिली. दोषीवर तातडीने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशार यावेळी दिला. 

प.स. सदस्य मोहन वानखेडे, नंदु ढोबळे, विजय गुळांदे, महेद्र बुरुलेवार, कैलास गांधी रामेश्वर उईके, नितीन जुनघरे, प्रेमा गहूकर, मनुबाई चोपडे, मनीष गव्हानकर, सुनील कामडी यांच्यासह शकडो कॉंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख