आजचा वाढदिवस : संतोष दानवे, आमदार, भाजप भोकरदन-जाफराबाद मतदारसंघ - santosh danave mla | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : संतोष दानवे, आमदार, भाजप भोकरदन-जाफराबाद मतदारसंघ

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

विधानसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपकडून ते भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. राज्यातील सर्वांत तरुण आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व चारवेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार रावसाहेब दानवे यांचे संतोष पुत्र आहेत. 2005 मध्ये संतोष दानवे यांनी तालुक्‍यात संतोष दानवे मित्रमंडळाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवत सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवले. 2011 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले. 2012 मध्ये मतदारसंघातील रामेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.

विधानसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपकडून ते भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. राज्यातील सर्वांत तरुण आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व चारवेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार रावसाहेब दानवे यांचे संतोष पुत्र आहेत. 2005 मध्ये संतोष दानवे यांनी तालुक्‍यात संतोष दानवे मित्रमंडळाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवत सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवले. 2011 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले. 2012 मध्ये मतदारसंघातील रामेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते सरचिटणीसही आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख